-
दूरचित्रवाणीवर दीर्घकाळ चाललेल्या 'बालिका वधू' या यशस्वी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
-
गुरुवारी सकाळी दहानंतर सिद्धार्थला जुहू येथील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
-
सिद्धार्थच्या मृत्यूचे निश्चित कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी निरोगी असलेल्या सिद्धार्थसारख्या तरुण कलाकाराचा अचानक ओढवलेला मृत्यू त्याच्या चाहत्यांसह सहकलाकारांनाही चटका लावून जाणारा ठरला.
-
सिद्धार्थ शुक्ला बुधवारी दुपारी एका प्रोजेक्टच्या मिटिंगसाठी गेला होता.
-
रात्री जवळपास साडे आठ वाजता तो घरी पोहचला. त्यानंतर तो बिल्डिंगमधील कंपाउंडमध्ये जॉगिंगसाठी गेला. जवळपास रात्री साडेदहा वाजता तो घरी परतला. त्यानंतर त्याने जेवण केलं.
-
सूत्रांच्या माहितूनुसार जेवण करत असतानाच त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तो झोपी गेला.
-
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला जाग आली आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले.
-
छातीत दुखत असल्याचे त्याने आईला सांगितले. त्याच्या आईने त्याला प्यायला पाणी दिले आणि झोपण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर सिद्धार्थ सकाळी उठलाच नाही.
-
आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आईने सिद्धार्थच्या बहिणीला फोन केला, आणि बहिणीने डॉक्टरांना फोन करून माहिती दिली.
-
सकाळी ९.४० वाजताच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला कूपर रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी त्याची बहीण, मेहुणा, चुलत भाऊ आणि तीन मित्र उपस्थित होते.
-
सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे, मात्र सिद्धार्थला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते, असे स्पष्ट करत शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकेल, असे कूपर रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
-
पोलीस पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होण्यास लागलेला विलंब यामुळे सिद्धार्थच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.
-
सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
-
१९८० साली मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थने मॉडेलिंग आणि जाहिरात क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता.
-
२००८ मध्ये 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिके पासून छोट्या पडद्यावर त्याचे पदार्पण झाले.
-
त्यानंतर 'जाने पेहचाने से ये अजनबी', 'आहट' आणि 'सीआयडी' मालिकेचे काही भाग तसेच 'लव्ह यू जिंदगी'सारख्या मालिकांमधून त्याने काम केले.
-
२०१२ साली कलर्स वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या 'बालिका वधू' मालिकेतील शिवच्या भूमिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.
-
'इंडियाज गॉट टॅलेन्ट'च्या सातव्या पर्वाचे सूत्रसंचालन, 'फीअर फॅ क्टर : खतरों के खिलाडी' या शोचे विजेतेपद यामुळे त्याची लोकप्रियता वाढत गेली.
-
'बिग बॉस'च्या विजेतेपदाने या लोकप्रियतेचा कळस गाठला होता. त्याची 'ब्रोकन बट ब्युटीफु ल' ही पहिलीच वेबमालिकाही नुकतीच प्रदर्शित झाली होती.
-
काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी'मध्येही त्याने खास पाहुणा म्हणून हजेरी लावली होती.
-
'बालिका वधू' सुरू असतानाच त्याने 'झलक दिखला जा' या नृत्यावर आधारित रिअॅलिटी शोच्या सहाव्या पर्वात सहभाग घेतला होता. याच मालिकेतील लोकप्रियतेमुळे करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने त्याला तीन चित्रपटांसाठी करारबद्ध केले होते.
-
या करारांतर्गत २०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
सिद्धार्थचे रुपेरी पडद्यावरील पदार्पण फारसे यशस्वी ठरले नसले तरी छोट्या पडद्यावरची त्याची लोकप्रियता कायम अबाधित राहिली.
-
सिद्धार्थच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सिद्धार्थ शुक्लाला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ शुक्ला / इन्स्टाग्राम)
Sidharth Shukla Death: काय घडलं त्या रात्री?
Web Title: Bigg boss 13 winner actor sidharth shukla passed away from heart attack know about what happened the night before his death information photos sdn