-
पर्यटकांना लंडन शहराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रसिद्ध London eye (लंडन आय) या इमारतीच्या धर्तीवर 'मुंबई आय' उभारण्यात येणार आहे. यामुळे उंचावरुन मुंबई शहर न्याहाळण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मात्र ज्या 'लंडन आय'च्या धर्तीवर मुंबईमध्ये 'मुंबई आय' उभारण्यात येणार आहे ते 'लंडन आय' नक्की आहे तरी कसे जाणून घेऊयात.
-
'लंडन आय' हा लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा आहे.
-
'लंडन आय'ला जायंट व्हील किंवा फेरिस व्हील प्रकारात मोडतो.
-
थेम्स नदीच्या काठावरील 'लंडन आय'चा पाळणा आहे.
-
'लंडन आय' हे युनायटेड किंग्डममधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
-
'लंडन आय' हे लंडनमधील सर्वात प्रसिद्ध लॅण्डमार्कपैकी एक मानले जाते.
-
दरवर्षी 'लंडन आय'ला सुमारे ३५ लाख पर्यटक भेट देतात.
-
'लंडन आय'ची उंची १३५ मीटर आहे.
-
३१ डिसेंबर १९९९ रोजी हा पाळणा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.
-
३१ डिसेंबर १९९९ रोजी साली तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते 'लंडन आय'चे उद्घाटन झाले.
-
'लंडन आय' सुरु झाले तेव्हा हा जगातील सर्वाधिक उंचीचा पाळणा होता.
-
'लंडन आय'च्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी पाउंड इतका खर्च आला.
-
'लंडन आय'वर खास दिवशी विशेष रोषणाई करण्यात येते.
-
'लंडन आय' पाळण्याला २५ पर्यटक बसू शकतील अशा ३२ कॅपसुल्स आहेत.
-
'लंडन आय'मधून संपूर्ण लंडन शहर एका नजरेत पाहता येते.
-
'लंडन आय'ची एक फेरी अर्धा तास सुरु राहते.
-
'लंडन आय' हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
-
'लंडन आय'ची रचना जुलिया बारफिल्ड आणि डेव्हिड मार्क्स या नवरा-बायकोने केली आहे.
-
रात्रीच्या वेळी या पाळण्याचा विशेष रोषणाई केली जाते.
-
वरवर पाहता हा पाळणा सायकलच्या एखाद्या चाकासारखा दिसतो.
-
londoneye.com ही या पाळण्यासंदर्भात माहिती मिळण्याची अधिकृत वेबसाईट आहे.
‘लंडन आय’प्रमाणे साकारणार ‘मुंबई आय’! जाणून घ्या ‘लंडन आय’बद्दलच्या खास गोष्टी
लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा
Web Title: Everything you want to know about london eye mumbai eye scsg