-
घरात आईने कारलं हे नाव जरी उच्चारलं तरी अनेक जणांच्या कपाळावर आठ्या पडतात. लहान मुलं तर नाक मुरडतात. मात्र चवीने कडू असणाऱ्या कारल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच आयुर्वेदातही कारल्याला अत्यंत महत्वं आहे.म्हणूनच कारलं कितीही नावडतं असलं तरीदेखील आपल्या आहारात त्याचा समावेश केलाच पाहिजे. तसंच कारल्याचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी कारल्याचा रस प्यायला हवा. जाणून घेऊयात काय आहेत कारल्याच्या रसाचे फायदे
-
कारल्याच्या रसामुळे रक्तशुद्ध होते. त्यामुळे त्वचा विकार होण्याचा धोका कमी होतो.
-
कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो सकाळ, संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते.
-
यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस फायदेशीर असतो.
-
पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो. पोटात कृमी किंवा जंत झाल्यास कारल्याचा रस प्यावा.
-
दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे त्रास दूर होतात.
-
कारले हे शक्तीवर्धक आहे म्हणून लहानमुलांच्या आहारातही कारल्याचा समावेश आवर्जून करावा.
कारल्याचा रस पिण्याचे हे आहेत फायदे, वाचाल तर चकित व्हाल!
Web Title: Unbelievable health benefits of bitter gourd juice asy