• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. world chocolate day 2020 top 10 chocolate recipes which can be made at home scsg

World Chocolate Day 2020: घरच्या घरी अगदी सहज बनवता येतील अशा १० रेसिपी

चॉकलेट फाँडय़ू, चॉकलेट बर्फी, हॉट चॉकलेट अन् बरच काही…

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • चॉकलेट म्हणजे अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ. चॉकलेटचं साधं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. सध्या बाजारात विविध प्रकारचे, आकाराचे चॉकलेट मिळतात. त्यात सुद्धा डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट असे एक ना अनेक प्रकार आहेत. आज आहे ७ जुलै म्हणजेच वर्ल्ड चॉकलेट डे. तसं चॉकलेट हे कोणत्याही दिवशी आणि कधीही खाऊ शकतो असे अनेकजण आपल्याला सापडतील. मात्र आजचा दिवस थोडा खास आहे. याच चॉकलेट डे निमित्त आज आपण जाणून घेणार आहोत १० खास घरच्या घरी बनवता येणाऱ्या चॉकलेट रेसिपी.... (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)
    1/11

    चॉकलेट म्हणजे अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ. चॉकलेटचं साधं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. सध्या बाजारात विविध प्रकारचे, आकाराचे चॉकलेट मिळतात. त्यात सुद्धा डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट असे एक ना अनेक प्रकार आहेत. आज आहे ७ जुलै म्हणजेच वर्ल्ड चॉकलेट डे. तसं चॉकलेट हे कोणत्याही दिवशी आणि कधीही खाऊ शकतो असे अनेकजण आपल्याला सापडतील. मात्र आजचा दिवस थोडा खास आहे. याच चॉकलेट डे निमित्त आज आपण जाणून घेणार आहोत १० खास घरच्या घरी बनवता येणाऱ्या चॉकलेट रेसिपी…. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)

  • 2/11

    चॉकलेट बर्फी : साहित्य – कोको पावडर अर्धी वाटी, पांढरा खवा २ वाटय़ा, पिठीसाखर दीड वाटी, मिल्क पावडर अर्धी वाटी. कृती – सर्वप्रथम खवा भाजून त्यामध्ये कोको पावडर मिसळून थंड करा. नंतर यात मिल्क पावडर व पिठीसाखर घालून एकत्र करा. साच्यामध्ये टाकून वडय़ा पाडा. (रेसिपी: शेफ विष्णू मनोहर)

  • 3/11

    चॉकलेट फाँडय़ू : हा एक स्विस खाद्यप्रकार आहे. तो घरच्या घरी कसा बनावता येईल त्याची ही रेसिपी. साहित्य -२५० ग्राम डार्क चॉकलेट स्लॅब, २५० ग्राम क्रीम, ६० मिली रम (आवडीनुसार) टॉपिंगसाठी – केळी, सफरचंद, द्राक्ष, केक स्पाँज, वेफर बिस्कीट कृती – एका पॅनमध्ये क्रीम गरम करा. वाफेवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये चॉकलेट वितळून घ्या. आता क्रीम आणि चॉकलेट एकत्र करून ढवळून घ्या. हा झाला चॉकलेट सॉस. त्यात तुम्ही रमही घालू शकता. आता फळांचे तुकडे करून घ्या. तसेच केक स्पाँजचेही हव्या त्या आकाराचे तुकडे करून घ्या. फ्रुट फोर्कवर टॉपिंगचे साहित्य आवडीप्रमाणे लावून ते चॉकलेटसॉसमध्ये बुडवून फस्त करा. (रेसिपी: नीलेश लिमये)

  • 4/11

    चॉकलेट पिझ्झा: साहित्य – कणीक २ वाटय़ा, कोको पावडर १ वाटी, मीठ २ ग्रॅम, साखर १० ग्रॅम, यीस्ट १० ग्रॅम, चॉकलेट कॅडबरी २ नग, मिल्क पावडर अर्धी वाटी, पनीर अर्धी वाटी, ब्रिटानिया प्रोसेस चीज अर्धी वाटी, मोझेरोला चीज अर्धी वाटी, बटर २ चमचे, मध ४ चमचे. कृती – कणीक, मीठ, कोको पावडर, मिल्क पावडर, साखर एकत्र करून त्याचा पिझ्झा बेस बनवा. पिझ्झा बेस तयार करून त्याला १० मिनिटे फरमेंट करा. त्यावर पनीरचे तुकडे, कॅडबरी चॉकलेट व चीज पसरवून बेक करा. वरून मधाचे टॉपिंग करून खायला द्या. याचा आकार छोटा असावा व आइस्क्रीमबरोबर सव्‍‌र्ह करावे. (रेसिपी: शेफ विष्णू मनोहर)

  • 5/11

    चॉकलेट व्हेगन केक: साहित्य – अडीच कप मैदा, अर्धा कप साखर, पाऊण कप कोको पावडर, ३ चमचे बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ, २ कप बदामाचे दूध, अर्धा कप नारळ तेल, दीड कप अ‍ॅपल सॉस, २ चमचे अ‍ॅपल सिडीर व्हिनेगर, १ चमचा व्हॅनिला इसेन्स कृती – एका भांडय़ात मैदा, साखर, कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून घ्या. दुसऱ्या बाजूला बदामाचे दूध, अ‍ॅपल सॉस, व्हिनेगर, व्हॅनिला इसेन्स, तेल एकत्र करून घ्या. वरील दोन्ही मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या. ८ इंच व्यासाच्या डब्यात खाली व कडेला नारळ तेलाचा पातळ हात फिरवून त्यावर मिश्रण ओता. ओव्हन ३५० डिग्री फॅरेन्हाइट तापमानाला प्रीहीट करा आणि ४० ते ४५ मिनिटे बेक करा. (रेसिपी: डॉ. मानसी पाटील)

  • 6/11

    चॉकलेट पुडिंग साहित्य – कोको पावडर १ कप, साखर पाव कप, अंडी १ नग, कॉर्नस्टार्च २ चमचे, मीठ चिमूटभर, दूध २ कप, चॉकलेट चिप्स पाव वाटी, फ्रेश क्रीम १ कप, किसलेले चॉकलेट पाव वाटी. कृती – सर्व प्रथम पाव कप साखर, १ कप कोको पावडर, १ अंडे, २ चमचे कॉर्नस्टार्च, चिमूटभर मीठ एकत्र करून त्यात २ कप दूध घाला. नंतर डबल बॉयलिंग पद्धतीने गरम करा. गरम करतानाच त्यामध्ये पाव वाटी चॉकलेट चिप्ससुद्धा घाला. त्यानंतर हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये १ कप फ्रेश क्रीम घाला. मिश्रण एकत्र करून एका भांडय़ामध्ये सेट होण्याकरिता ठेवा. फ्रिजमध्ये तासभर ठेवून सव्‍‌र्ह करतेवेळी वरून किसलेले चॉकलेट घाला. (रेसिपी: शेफ विष्णू मनोहर)

  • 7/11

    चॉकलेट लाडू साहित्य – पोळ्या ८-१० नग, बदाम, पिस्त्याचे तुकडे १ वाटी, गूळ अर्धी वाटी, चॉकलेट ग्रॅन्युअल १ वाटी, चॉकलेटचे मोठे बार २ नग, तूप ४ चमचे. कृती – पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये गूळ, तूप, सुका मेवा घालून मिश्रण एकत्र करा. सर्वात शेवटी चॉकलेट ग्रॅन्युअल घालून छोटे-छोटे लाडू वळा. चॉकलेट सॉस थोडे कोमट करून त्यामध्ये हे लाडू बुडवून साखरेवर घोळवा. फ्रिजमध्ये थंड करून खायला द्या. (रेसिपी: शेफ विष्णू मनोहर)

  • 8/11

    हॉट चॉकलेट: साहित्य – २ कप दूध, चॉकलेट, लोणी, जायफळ किंवा दालचिनी पूड, मार्शमेलो, बदाम कृती – दोन कप दूध गरम करत ठेवा, ते गरम होईपर्यंत घरात असलेले कोणतेही चॉकलेट किसून मायक्रोवेव्हमध्ये विरघळवून घ्या. यामध्ये थोडे लोणी घालून परत ओव्हनमध्ये १ मिनीटभर ठेवा. आता घोटून हळूहळू दुधात मिसळा. मंद आचेवर हे मिश्रण छान एकत्र करून घ्या. स्वादासाठी यामध्ये जायफळ अथवा दालचिनीची पूड घालता येईल. आवडत असेल तर किसलेले चॉकलेटही घालता येईल. मार्शमेलो किंवा बदामाचे तुकडेही या दुधात घालता येतात. (रेसिपी: शुभा प्रभू साटम)

  • 9/11

    आइस्ड चॉकलेट:  साहित्य  – पाऊण कप गरम पाणी, अर्धा कप साखर, पाव कप कोको पावडर, १ चमचा चॉकलेट सिरप, १कप दूध, २ कप बर्फ, पाव कप क्लब सोडा, ४ स्कूप चॉकलेट आईसक्रीम, पुदिन्याची पाने कृती  – गरम पाण्यामध्ये साखर, कोको पावडर आणि चॉकलेट सिरप मिसळून घ्या. त्यात दूध घालून गार करायला ठेवून द्या. या मिश्रणात बर्फ घाला आणि मिश्रण चांगले घोटून घ्या. ग्लासाच्या तळाशी क्लब सोडा ओता. त्यानंतर त्यात चॉकलेटचे मिश्रण ओता. आता यावर आईस्क्रीमचा स्कूप ठेवा आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा. (रेसिपी: के. नायडू )

  • 10/11

    बदाम चिली रॉक्स साहित्य : भाजलेले बदाम १ कप, डार्क  चॉकलेट १ कप, वाळवलेल्या क्रॅनबेरीज १/३ कप, मिरची पावडर (तिखट) चिमूटभर. कृती : एका बाऊ लमध्ये चॉकलेट व लोणी घेऊन मायक्रोवेव्हमध्ये गरम करून चॉकलेट वितळवून घ्या. वितळवलेल्या चॉकलेटमध्ये बदाम आणि क्रॅनबेरीज घाला. ट्रेला तेल लावून ग्रीस करून घ्या. ट्रेमध्ये एक टेबलस्पून मिश्रण घेऊन बदाम रॉक्सचा एक भाग बनेल याची काळजी घ्या. तुम्ही हे मिश्रण मोल्डमध्ये किंवा छोटय़ा पेपर कप्समध्येही घालू शकता. सेट होईपर्यंत थंड होऊ  द्या आणि सव्‍‌र्ह करा बदाम चिली रॉक्स. (रेसिपी: शेफ विकी रतनानी)

  • 11/11

    चॉकलेट ब्राऊनी साहित्य – मदा अर्धा कप, कोको पावडर पाव कप, बेकिंग पावडर पाव चमचा, मीठ पाव चमचा, साखर १ कप, बटर किंवा मार्गारीन अर्धा कप, अंडे २ नग. कृती – ओव्हन ३५० डिग्री फॅरनहीटवर गरम करा. ९ इंचाचा बेकिंग ट्रे  ग्रीस करून घ्या. बटरमध्ये साखर, अंडी मिसळून मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा. नंतर मदा, कोको पावडर, बेकिंग पावडर व मीठ एकत्र करून चाळून घ्या. यात वरील तयार केलेले मिश्रण मिसळा. तयार झालेले मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये टाकून १८० डिग्री फॅरनहीटवर २५ मिनिटे बेक करा. (रेसिपी: शेफ विष्णू मनोहर)

Web Title: World chocolate day 2020 top 10 chocolate recipes which can be made at home scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.