Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. monsoon health tips home remedy for throat infection scsg

घसा खवखवतोय?; ‘हे’ सोपे घरगुती उपाय करुन बघा

वातावरण बदललल्याने शरीरावर त्याचे काही ना काही परिणाम होतातच

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • पावसाळ्याचे दिवस आले की घशाची खवखव ठरलेलीच. मग अगदी तुम्ही घरात असलात तरी किंवा कुठे बाहेर जात असलात तरी घशाचा त्रास हा हमखास ठरलेला आहे. घसा खवखवत असेल तर सतत त्याचा त्रास होत राहतो. उगाचच आजारी असल्यासारखं वाटतं. अगदी बोलताना, खाताना त्रास होतो. आता वातावरण बदललल्याने शरीरावर त्याचे काही ना काही परिणाम तर होणारच. त्यातही इतक्या लहान तक्रारीसाठी डॉक्टरांकडे कशाला जायचे म्हणून आपण ती गोष्ट अंगावर कढतो. पण असे अंगावर काढल्यास त्या त्रास होऊ शकतो. त्यामुळे या समस्येसाठी काही घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात अगदी सहज करता येतील असे सोपे आणि घरगुती उपाय….
    1/7

    पावसाळ्याचे दिवस आले की घशाची खवखव ठरलेलीच. मग अगदी तुम्ही घरात असलात तरी किंवा कुठे बाहेर जात असलात तरी घशाचा त्रास हा हमखास ठरलेला आहे. घसा खवखवत असेल तर सतत त्याचा त्रास होत राहतो. उगाचच आजारी असल्यासारखं वाटतं. अगदी बोलताना, खाताना त्रास होतो. आता वातावरण बदललल्याने शरीरावर त्याचे काही ना काही परिणाम तर होणारच. त्यातही इतक्या लहान तक्रारीसाठी डॉक्टरांकडे कशाला जायचे म्हणून आपण ती गोष्ट अंगावर कढतो. पण असे अंगावर काढल्यास त्या त्रास होऊ शकतो. त्यामुळे या समस्येसाठी काही घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात अगदी सहज करता येतील असे सोपे आणि घरगुती उपाय….

  • 2/7

    वाफ घ्या >> थंडीमध्ये घशाचे इन्फेक्शन होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. याच्या जोडीला येणारा ताप, सर्दी यामुळे आपण हैराण होऊन जातो. पण वाफ घेणे हा यारील सोपा उपाय आहे.

  • 3/7

    घरच्या घरी गरम पाणी करुन त्याची वाफ घेतल्यास घशाला आराम पडतो. दिवसातून दोन ते ती वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.

  • 4/7

    गुळण्या करा >> सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे गेल्यास तेही औषधांबरोबर गुळण्या करायला सांगतात. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने त्याचा निश्चित फायदा होतो.

  • 5/7

    ऑफीसमध्ये किंवा बाहेरुन घरी असल्यास कोमट पाणी आणि मीठाने मात्र ते शक्य नसले तर साध्या पाण्याने का असेना गुळण्या कराव्यात. त्यामुळे घसा मोकळा व्हायला मदत होते.

  • 6/7

    गरम पेय फायद्याचे >> घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशावेळी गरम चहा, कॉफी किंवा सूप प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो.

  • 7/7

    चहामध्ये तुळस, लवंग, आले घातल्यास घशासाठी तो जास्त उपयुक्त होतो. असा चहा दिवसातून २ वेळा घेतला तरी घशाला आराम मिळतो.

Web Title: Monsoon health tips home remedy for throat infection scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.