• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tata punch micro suv price in india features specifications and variants scsg

कमी बजेट असणाऱ्यांचं SUV चं स्वप्न पूर्ण करणारी ‘टाटा मोटर्स’ची Punch बाजारात; जाणून घ्या फिचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत

बाजारामध्ये दाखल होण्याआधीच तिचे फिचर्स, किंमत आणि इतर गोष्टींबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती, अखेर आज कंपनीने याबद्दलची औपचारिक घोषणा केली.

October 18, 2021 16:58 IST
Follow Us
  • TATA Punch Micro SUV Price in India Features Specifications and Variants
    1/24

    टाटा मोटर्सने आपली नवीन गाडी बाजारात आणली आहे. या गाडीचं नाव टाटा पंच असं आहे.

  • 2/24

    ही गाडी अधिकृतपणे बाजारामध्ये दाखल होण्याआधीच तिचे फिचर्स, किंमत आणि इतर गोष्टींबद्दल चांगलीच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं.

  • 3/24

    मात्र टाटाने आता अधिकृतपणे या गाडीच्या किंमतींचा आणि फिचर्ससंदर्भात खुलासा केलाय

  • 4/24

    टाटा मोटर्सने बाजारात आणलेली ही कार सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही प्रकारातील आहे.

  • 5/24

    ४ ऑक्टोबर रोजी कंपनीने या कारच्या नावाची आणि ती लवकरच बाजारात येत असल्याची घोषणा केली होती. ही या सेगमेंटमधील सर्वोत्तम कार असल्याचा दावा टाटा मोटर्सने केलाय.

  • 6/24

    विशेष म्हणजे टाटा पंचच्या बुकींगला ४ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून २१ हजारांची रक्कम देऊन ही कार बूक करता येत आहे.

  • 7/24

    मॅन्युएल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय टाटा पंचमध्ये उपलब्ध आहेत.

  • 8/24

    मॅन्यूएल ट्रान्समिशनमध्ये ही गाडी प्रती लीटरमागे १८.९७ किमीचं एव्हरेज देईल असं कंपनीने म्हटलं आहे. तर ऑटोमॅटिकमध्ये गाडीचं एव्हरेज प्रति लीटरमागे १८.८२ असेल असं कंपनीचं म्हणणं आहे.

  • 9/24

    या नव्या एसयूव्हीमध्ये १.२ लीटरचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

  • 10/24

    ही कार ६.५ सेकंदांमध्ये ० ते ६० किमी प्रती सात आणि १६.५ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी प्रती तास वेग पकडू शकते.

  • 11/24

    टाटा पंचच्या इंटीरियर आणि फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये सात इंचांची टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आलीय.

  • 12/24

    स्टेअरिंग कंट्रोल, ३६६ लीटर बूट स्पेस, फ्रण्ट आणि रेअर पॉवर विंडो यासारख्या सुविधा गाडीत आहेत.

  • 13/24

    तसेच अॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल, रीयल फ्लॅट सीट, फुल्ली ऑटेमेटेड टेम्परेचर कंट्रोलसारखे फिचर्सही गाडीत आहेत.

  • 14/24

    टाटा पंचची ही गाडी या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक असल्याचं सांगण्यात येतं.

  • 15/24

    जागतील स्तरावरील एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये अडल्ट सेफ्टीच्या दुष्टीकोनातून या गाडीला पाच स्टार रेटिंग देण्यात आलंय.

  • 16/24

    टाटा पंचमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ड्युएल एअरबँग देण्यात आल्यात.

  • इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशनसोबतच अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि कॉर्नर सेफ्टी कंट्रोलही देण्यात आलाय.
  • 17/24

    या सेगमेंटमधील कारमध्ये पहिल्यांदाच ब्रेक स्वे कंट्रोल सिस्टीम देण्यात आल्याचा दावा टाटाने केलाय.

  • 18/24

    कारमध्ये चाइल्ट सीटसाठी अँकर पॉइंट, रीव्हर्स पार्किंग कॅमेरा, ड्रायव्हर एण्डबरोबरच को ड्रायव्हर सीटसाठी सीट बेल्ट रिमाइण्डर देण्यात आलाय. टायर पंक्चर रिपियर कीटही देण्यात आलंय.

  • 19/24

    ही गाडी निळ्या, लाल, मेट्रो ब्रॉन्झ, अॅटॉमिक ऑरेंज, ट्रॉपिकल मिस्ट, डायटोना ग्रे आणि पांढऱ्या या सात रंगांमध्ये उपलब्ध असेल.

  • 20/24

    टाटा पंचच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास ही गाडी ५ लाख ५९ हजारांपासून उपलब्ध आहे.

  • 21/24

    एक्स शोरुममध्ये ५ लाख ४९ हजारांना उपलब्ध होणाऱ्या गाडीच्या बेसिक मॉडेलमध्ये पेट्रोल मॅन्यूअल इंजिन देण्यात आलं आहे.

  • 22/24

    गाडीच्या टॉप एण्ड मॉडेलचं नाव क्रिएटीव्ह असं असून त्याची किंमत ८.७९ लाख रुपये इतकी आहे.

  • 23/24

    आता या गाडीला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Web Title: Tata punch micro suv price in india features specifications and variants scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.