-
युजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅप सतत नवनवीन फीचर्स जारी करत असते. या महिन्याच्या सुरुवातीला, व्हॉट्सअॅपने एक नवीन गोपनीयता वैशिष्ट्य जारी केले. यामुळे, वापरकर्त्यांना अधिक नियंत्रण देण्यात आले. (संग्रहित फोटो)
-
फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने माय कॉन्टॅक्ट्स एक्स्पेप्ट हे नवीन फीचर जारी केले आहे. एका रिपोर्टनुसार, हे फीचर आत्तापर्यंत फक्त WhatsApp Android Beta साठी उपलब्ध होते. आता कंपनी इतर वापरकर्त्यांसाठी देखील ते जारी करत आहे. (संग्रहित फोटो)
-
WABetaInfo ने याबाबत वृत्त दिले आहे. रिपोर्टनुसार, अॅपच्या अपडेटेड आवृत्ती 2.2146.5 सह, हे फिचर वेब आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध झाले आहे. (संग्रहित फोटो)
-
व्हॉट्सअॅपवर या फिचरसह युजर्स काही बाबी कंट्रोल करू शकतात. लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाईल फोटो आणि अबाउट डिस्क्रिप्शन कोण बघू शकतं हे ठरवू शकता. हे फिचर प्रायव्हेसी सेटिंगमधून एक्सेस करू शकतो. (संग्रहित फोटो)
-
व्हॉट्सअॅपमध्ये सध्या Everyone, My Contacts आणि Nobody हे पर्याय दिले गेलेत. या फिचर्सच्या मदतीने युजर्स आता ठरवू शकतील. (Photo- Reuter)
-
यामध्ये युजर्स जे कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट करतील, ते यूजरची ही माहिती पाहू शकणार नाहीत. यासह वापरकर्त्यांना प्रायव्हसी संदर्भात एक नवीन नियंत्रण मिळेल. (Photo- Indian Express)
व्हॉट्सअॅपच्या ‘या’ युजर्संना मिळणार खास फिचर; ठरवू त्यालाच दिसणार डीपी
युजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅप सतत नवनवीन फीचर्स जारी करत असते.
Web Title: Whatsapp users will get special feature decide who will see the dp rmt