-
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये जीप इंडियाची जोरदार चर्चा आहे, कंपनी यावर्षी भारतात त्यांची दोन उत्पादने सादर करण्याचा विचार करत आहे. खरं तर, गेल्या एका वर्षात कंपनीने १३० टक्क्यांची वाढ केली आहे. तर मागील वर्ष करोना संसर्गामुळे अतिशय वाईट गेले आणि पार्ट पुरवठ्यावरही परिणाम झाला होता.
-
करोना संसर्गाच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचा प्रभाव असून कंपनीला आशा आहे की, कंपनी यावर्षी चांगली कामगिरी करेल. जीप इंडियाचे प्रमुख निपुण महाजन यांनी पीटीआयशी संवाद साधताना ही माहिती दिली.
-
गेल्या एका वर्षात १२,१३६ युनिट्सची विक्री झाली आहे. यात एक एसयूव्ही कंपास आणि स्थानिक स्तरावर असेंबल केलेले रँग्लर मिळते.
-
कंपनी सध्या दोन उत्पादने तयार करत आहे, जी तिच्या पोर्टफोलिओमध्ये देखील समाविष्ट आहेत आणि त्यांची नावे कंपास आणि रॅंगलर आहेत. कंपनी २०१७ पासून पुण्याजवळील प्लांटमध्ये जीप कंपासचे उत्पादन करत आहे.
-
महाजन यांनी पीटीआयशी संवाद साधताना सांगितले की, कंपनीने गेल्या वर्षी मार्चपासून जीप रँग्लर असेंबल करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये २० टक्के विक्री वाढ केली आहे. कंपास ट्रेलहॉक देखील फेब्रुवारीमध्ये दार ठोठावेल. (वरील सर्व फोटो JeepIndia.com वरून साभार)
Jeep India भारतात लॉन्च करणार दोन प्रोडक्ट; कारप्रेमींमध्ये उत्सुकता
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये जीप इंडियाची जोरदार चर्चा आहे,
Web Title: Jeep india launch two products in february 2022 rmt