• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diabetes does eating rice raise blood sugar ttg

Diabetes: भात खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का?

WHO च्या म्हणण्यानुसार, डायबिटीज हा आजार भारतात इतक्या वेगाने पसरत आहे की त्याच्या रुग्णांची संख्या ५० दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे.

March 28, 2022 15:34 IST
Follow Us
  • डायबिटीज किंवा मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्याच्या रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, हा आजार भारतात इतक्या वेगाने पसरत आहे की त्याच्या रुग्णांची संख्या ५० दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. (फोटो:Pixabay)
    1/12

    डायबिटीज किंवा मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्याच्या रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, हा आजार भारतात इतक्या वेगाने पसरत आहे की त्याच्या रुग्णांची संख्या ५० दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. (फोटो:Pixabay)

  • 2/12

    अयोग्य आहार आणि खराब जीवनशैली ही मधुमेहाची कारणे आहेत. या आजाराच्या रुग्णांनी आहारावर नियंत्रण ठेवले नाही तर त्यांच्या समस्या वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (फोटो: Indian Express)

  • 3/12

    मधुमेहाच्या रुग्णांनी अन्नात पिष्टमय (स्टार्च) पदार्थांचे सेवन कमी करावे अन्यथा त्यांच्या समस्या वाढू शकतात. (फोटो: Indian Express)

  • 4/12

    रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे साखर नियंत्रणात राहते. मधुमेही रुग्णांनी खाण्याच्या सवयी सुधारल्या तर हा आजार बऱ्याच अंशी आटोक्यात ठेवता येतो.(फोटो: Pixabay )

  • 5/12

    मधुमेहाच्या रुग्णांनी भात खावा का? मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखरेच्या रुग्णांनी आहारातून भात वगळावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (फोटो: Freepik )

  • 6/12

    भात खायचा असेल तर काही खास प्रकारचा भात खा. भात खाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे आणि त्याऐवजी आपण कोणत्या प्रकारचे भात वापरू शकतो ते जाणून घेऊया. (फोटो: Freepik )

  • 7/12

    भात साखर कशी वाढवते? ब्रिटिश मेडिकल जर्नलनुसार, पांढरा तांदूळ टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढवू शकतो. तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो जो रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवण्यास जबाबदार असतो. (फोटो: Indian Express)

  • 8/12

    तांदळातील उच्च ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवते. त्यात सूक्ष्म अन्नद्रव्ये, फायबर आणि पॉलिफेनॉलचे प्रमाण खूप कमी असते जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. (फोटो: Freepik )

  • 9/12

    मधुमेहाचे रुग्ण एका दिवसात फक्त ४५ ते ६० ग्रॅम कार्बोहायड्रेट घेऊ शकतात. पण भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते टाळलेलेच बरे. (फोटो: Freepik )

  • 10/12

    पॉप्युलेशन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट, हॅमिल्टन हेल्थ सायन्सेस आणि मॅकमास्टर युनिव्हर्सिटी कॅनडा यांनी साखर वाढवणाऱ्या पदार्थांवर दहा वर्षांचे संशोधन केले आहे, ज्यामध्ये असे समोर आले आहे की दक्षिण आशियातील लोक दिवसाला ६३० ग्रॅम तांदूळ खातात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. (फोटो: Freepik )

  • 11/12

    पांढरा तांदूळ पांढरा आणि चमकदार बनवण्यासाठी पॉलिशिंग केली जाते, ज्यामुळे आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे निघून जातात. भात खायचा असेल तर ब्राऊन राइस निवडा. तपकिरी तांदूळ फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकते. (फोटो: Freepik )

  • 12/12

    ब्राऊन राइसमध्ये स्टार्च कमी असतो आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. मधुमेहाचे रुग्ण ब्राऊन राइसचे सेवन करू शकतात. याशिवाय, तुम्ही रोल केलेले आणि स्टील-कट ओट्स, बार्ली, बल्गर, बाजरी आणि बकव्हीटचे पीठ वापरू शकता. (फोटो: Freepik )

TOPICS
मधुमेहDiabetesलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Diabetes does eating rice raise blood sugar ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.