-
हिंदू धर्मात तुळस ही अतिशय पूजनीय मानली आहे. ही केवळ पूजेसाठीच नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी देखील महत्त्वाची आहे.
-
आजच्या काळात माणसाच्या राहणीमान आणि घराच्या रचनेत बदल झाला आहे,तरी ही तुळशीला तितकेच महत्त्व आहे.
-
घरात तुळस लावणे फायदेशीर आहे. म्हणून आपल्या घरात तुळस आवर्जून लावावी.पण हे लावण्यासाठी काही नियम असतात चला तर मग काय आहे ते नियम जाणून घेऊ या.
-
जर या नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल.
-
घरात लावलेल्या हिरव्या तुळशीचे रोप अचानक कोमेजून सुकायला लागले, तर ते संकटाचे लक्षण आहे. जर तुमच्या घरात तुळस लावली असेल तर तिला सुकू देऊ नका. घराबाहेर पडताना सुद्धा तुळस सुकणार नाही याची व्यवस्था करूनच घराबाहेर पडा.
-
तुळशीला घरातील आंगणातच लावावे. घराच्या छतावर कधी तुळस लावू नये. तुळशीला छतावर लावलं की बुध ग्रह कमजोर होतो असं म्हटलं जातं.
-
बुधाचा संबंध थेट व्यापार आणि धनाशी येतो. यामुळे घरात अनेक आर्थिक संकटे येऊ लागतात.
-
तुळशीच्या पानांना चंद्रग्रहण, एकादशी आणि रविवारच्या दिवशी तोडू नये. जेव्हा तुम्ही अपवित्र असाल त्यावेळी सुद्धा तुळशीला स्पर्श करू नये.
-
घरात दक्षिण भागात तुळस लावू नये. यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. तुळस नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व भागात लावावी. यामुळे घरात सुख समृद्धी नांदू लागते.
तुम्ही घरात तुळस लावलीय? तर हा नियम एकदा वाचाच, अन्यथा संकटांचा सामना करावा लागेल
घरात तुळस लावणे फायदेशीर आहे. म्हणून आपल्या घरात तुळस आवर्जून लावावी.पण हे लावण्यासाठी काही नियम असतात चला तर मग काय आहे ते नियम जाणून घेऊ या.
Web Title: Follow these rules before planting tulsi in house otherwise you may have to face problems prp