-
दुधाची मलई आपण थेट त्वचेवर लावू शकता. तुम्हाला मलईचा सुगंध आवडत नसल्यास यामध्ये आपण चंदनाची पावडर मिक्स करू शकता. दोन्ही सामग्री नीट मिक्स करून त्वचेवर लावा. या नैसर्गिक उपचारामुळे त्वचा मऊ होण्यास मदत मिळते.
-
दह्यामध्ये लॅक्टिक आणि झिंक अॅसिड असते. हे दोन्ही त्वचेचा टोन हलका करण्यास मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावर दही लावा आणि दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.
-
बटाटा किसून त्याचा रस चेहऱ्यावर लावावा. काही वेळाने चेहरा सुकल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. काही दिवस हा उपाय करा. तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल.
-
सूर्यफुलाच्या बियांमध्ये जस्त, सेलेनियम, खनिजे, फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेचे पोषण करतात. त्वचा मऊ आणि निरोगी बनवण्यासाठी हे सर्व घटक खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नितळ त्वचा हवी असेल सू्र्यफुलाच्या बियांचा आहारात समावेश करा.
-
गुलाबजलमध्ये लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावा. यामुळे चेहरा उजळ होईल.
-
दह्यामध्ये लिंबू मिसळून लावल्याने त्वचा गोरी होते. तसेच चेहरा दुधाने धुतल्यास रंग उजळतो.
-
जिऱ्याचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठीही होतो. जिरे दूधात वाटून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा कोमल होईल आणि त्वचाही उजळेल.
-
लिंबामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा. काही दिवसांतच तुमची त्वचा उजळेल.
-
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळा आणि तो तयार पॅक चेहऱ्याला लावा. हा उपाय तुमच्या त्वचेला चमत्कारिक चमक देईल. (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)
Photos : घरगुती उपाय करून मिळवा नितळ आणि मऊ त्वचा !
प्रत्येक स्त्रीला आपली त्वचा गोरी आणि चमकदार हवी असते. जणू काही पार्लरला गेल्यावर जशी त्वचा चमकते तशीच त्वचा दररोज हवी, असे प्रत्येक महिलेचे म्हणणे असते. मात्र, याकरता दररोज पार्लरला जाणे काही शक्य नसते. मग, अशावेळी काय करावे, असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. यावर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला चक्क पार्लरसारखी…
Web Title: Remedies for glowing skin pdb