-
सुंदर लांब केस प्रत्येकाला आवडतात.
-
मात्र अपुरा आहार, बदलती जीवनशैली यामुळे केसगळतीची समस्या सुरू होते आणि केस भरपूर गळू लागतात.
-
शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या जास्त होते.
-
झिंकच्या कमतरतेमुळे केसगळती वाढते.
-
अशा स्थितीत झिंकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
-
केस निरोगी, मुलायम आणि लांब करण्यासाठी झिंक युक्त आहार घ्या.
-
मशरूम खाल्ल्याने झिंक, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनची कमतरता पूर्ण होते.
-
अंड्यातील पिवळ बलक खाल्ल्याने झिंकची कमतरता भरून काढता येते. यामध्ये झिंक, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी12, थायामिन, व्हिटॅमिन बी6, फोलेट आणि फॉस्फरस सारखे घटक आढळतात.
-
काजूमध्येही झिंक आढळते. काजूमध्ये तांबे, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए आणि फोलेट देखील असतात, ज्यामुळे केस मजबूत होतात.
-
तीळ केसांसाठी चांगले असतात. तिळामध्ये झिंक, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फॉलिक अॅसिड आणि बी कॉम्प्लेक्स असतात.
-
झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी रोज लसूण खा. लसूण हे जीवनसत्त्वे अ, ब आणि क, आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व प्रदान करते.
-
झिंकच्या कमतरतेवर मात करण्यासाठी शेंगदाणे खा.लोह, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फायबर देखील मिळतात.
Hair Fall: केस गळून गळून अगदी कमी झाले आहेत? तर आहारात ‘या’ झिंकयुक्त पदार्थांचा वेळीच समावेश करा, नक्की फायदा होईल
केस गळून टक्कल पडण्याची भीती सतावते आहे. तर आहारात ‘या’ झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करा.
Web Title: Include zinc rich food in your diet to prevent excessive hairfall gps