-
भारतात चहा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. विशेषत: दुधाचा चहा आपण आवडीने घेतो. (Photo : Pexels)
-
सकाळी उठल्यानंतर अनेक जण चहाने दिवसाची सुरुवात करतात आणि त्यानंतर दिवसातून दोनतीन वेळा चहा घ्यायलाही हे लोक कचरत नाहीत. त्यात संध्याकाळीही काही जण आवर्जून चहा पितात. पण, तुम्हाला माहिती आहे का संध्याकाळी चहा प्यायल्यानंतर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात? (Photo : Pexels)
-
याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भवसार-सावलिया सांगतात, “जवळपास ६४ टक्के भारतीय लोकांना चहा पिणे आवडते; पण त्यातील ३० टक्के लोक संध्याकाळी चहा पितात.” (Photo : Pexels)
-
तुम्हालाही संध्याकाळी चहा पिणे आवडते का? तुम्हाला ही चांगली सवय वाटते का? आणि संध्याकाळी चहा प्यावा की टाळावा? डॉ. दीक्षा भवसार-सावलिया यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. तुम्हालाही संध्याकाळी चहा पिणे आवडते का? तुम्हाला ही चांगली सवय वाटते का? आणि संध्याकाळी चहा प्यावा की टाळावा? डॉ. दीक्षा भवसार-सावलिया यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. तुम्हालाही संध्याकाळी चहा पिणे आवडते का? तुम्हाला ही चांगली सवय वाटते का? आणि संध्याकाळी चहा प्यावा की टाळावा? डॉ. दीक्षा भवसार-सावलिया यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.तुम्हालाही संध्याकाळी चहा पिणे आवडते का? तुम्हाला ही चांगली सवय वाटते का? आणि संध्याकाळी चहा प्यावा की टाळावा? डॉ. दीक्षा भवसार-सावलिया यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. (Photo : Pexels)
-
चांगली झोप, अॅसिडिटी होऊ नये व योग्य पचनक्रिया यासाठी झोपण्याच्या १० तास आधी चहा किंवा कॉफी घेणे टाळावे कारण त्यामध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते, असे डॉ. सावलिया आवर्जून सांगतात. (Photo : Pexels)
-
आहारतज्ज्ञ स्मृती झुनझुनवालाही सांगतात की, चहा पिणे वाईट नाही; पण तो कसा प्यावा, दुधाबरोबर प्यावा की नाही, किती प्रमाणात घ्यावा व दिवसातून किती वेळ घ्यावा, याविषयी नेहमी शंका निर्माण होते. (Photo : Pexels)
-
पण त्या पुढे सांगतात, “काळा चहा अधिक फायदेशीर आहे. काळ्या चहामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे अॅसिडीटी कमी होते आणि आरोग्य चांगले राहते; पण भारतीयांना चहामध्ये दूध आणि साखर घालण्याची सवय आहे. त्यामुळे चहामधील पौष्टिक गुणधर्म नाहीसे होतात.” (Photo : Pexels)
-
डॉ. सावलिया यांच्या मतानुसार, फक्त काही ठराविक लोकांचा गट संध्याकाळी चहाचा आस्वाद घेऊ शकतात. उदा. जे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात, ज्यांना अॅसिडिटी किंवा गॅस्ट्रिकचा कोणताही त्रास नाही, ज्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे, ज्यांना चहाचे व्यसन नाही, ज्यांना झोपेशी संबंधित कोणतीही समस्या नाही, जे लोक रोज वेळेवर जेवण करतात,
जे व्यक्ती अर्धा किंवा एक कप यापेक्षा कमी चहा पितात. (Photo : Pexels) -
“ज्यांना निद्रानाशाचा त्रास होतो, ज्यांना सतत ताण-तणाव असतो, ज्यांची त्वचा आणि केस लवकर कोरडे पडतात, ज्यांना केव्हाही भूक लागते, ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्यांना अॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित समस्या आहे, ज्यांचे वजन खूप कमी आहे, असे लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी संध्याकाही चहा पिणे टाळावे” डॉ. सावलिया सांगतात. (Photo : Pexels)
चहाप्रेमींनो, संध्याकाळी चुकूनही घेऊ नका चहा; नाही तर भोगावे लागू शकतात हे गंभीर परिणाम
तुम्हालाही संध्याकाळी चहा पिणे आवडते का? तुम्हाला ही चांगली सवय वाटते का? आणि संध्याकाळी चहा प्यावा की टाळावा? डॉ. दीक्षा भवसार-सावलिया यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.
Web Title: Chai lovers do not consume tea in the evening read about drinking tea at evening habit ndj