-
अंडे हा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेला पदार्थ आहे. चांगल्या आरोग्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. (Photo : Freepik)
-
लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण आवडीने अंडी खातात; पण तुम्हाला माहीत आहे का नियमित अंडी खाणे कितपत चांगले आहे? (Photo : Freepik)
-
यूएसमधील सेंट ल्युक मिड-अमेरिका हार्ट इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ डॉ. जेम्स डिनिकोलँटोनियो (James DiNicolantonio) त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगतात की, अंडी ही शत्रू नाहीत; तर अंडी नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन आहे आणि आपल्या शरीरासाठी ती निरोगी आहेत.” (Photo : Freepik)
-
अंडे हा निश्चितपणे एक पौष्टिक पदार्थ आहे. त्याचे आरोग्याला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. त्याशिवाय अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक आहेत; जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)
-
२०२३ च्या एका न्युट्रिअंट्स जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, कोंबडीच्या अंड्यामध्ये कोलीन, फोलेट, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, आयोडीन आणि चांगली गुणवत्ता असणारे प्रोटीन्स असतात; पण हायपर कोलेस्ट्रॉल, अॅनिमिया व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांवर अंडी फायदेशीर असल्याचे स्पष्टपणे सांगितले जात नाही. (Photo : Freepik)
-
त्यामुळे अंड्यांचे फायदे आणि तोटे याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.त्याशिवाय असेही समोर आलेय की, अंडी ही अत्यंत पौष्टिक, सहज उपलब्ध असणारी आणि परवडणारी आहेत. (Photo : Freepik)
-
मुंबई येथील भाटिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. सम्राट शाह सांगतात की, आठवड्यातून सात अंडी खाणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित मानले जाते. (Photo : Freepik)
-
डॉ. शाह सांगतात, “अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते; ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. पण, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, अंड्यातील कोलेस्ट्रॉलचा परिणाम प्रत्येकावर सारखा होत नाही.” (Photo : Freepik)
-
डॉ. शाह पुढे सांगतात, “म्हणून संतुलित आहाराचा भाग म्हणून मी कमी प्रमाणात अंडी खाण्याचा सल्ला देईन. जर तुम्हाला कोणता आजार किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असतील, तर अशा वेळी अंड्यांचे सेवन करण्याबाबत तुम्ही तुमच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.” (Photo : Freepik)
आठवड्यातून किती अंडी खावीत? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण आवडीने अंडी खातात; पण तुम्हाला माहीत आहे का नियमित अंडी खाणे कितपत चांगले आहे?
Web Title: How much eggs should we eat in a week read what health expert said about egg consumption ndj