-
कढीपत्ता हा भारतीय स्वयंपाकातील महत्त्वाचा पदार्थ आहे. अनेक भारतीय खाद्यपदार्थांमध्ये कढीपत्ता आवर्जून वापरला जातो कारण तो पदार्थाची जव आणखी वाढवतो. कढीपत्ता हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये कढीपत्ता वापरला जातो. (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x)
-
कित्येक लोक घरातचं कढीपत्याचे रोप लावतात जेणेकरून केव्हाही गरज पडली की पटकण वापरता येईल. पण बऱ्याचदा नियमित पाणी टाकूनही कढीपत्याची हवी तशी वाढ होत नाही. अनेकदा कढीपत्याच्या रोपाला कीडही लागते. अशावेळी तुम्ही कढीपात्याची चांगली वाढ व्हावी यासाठी खत वापरू शकता. (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x)
-
कढीपत्तासाठी एक विशेष खतं वापलं जात जे त्याच्या चांगल्या वाढीसाठी मदत करते. त्यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन पैसे खर्च करून महागडे खत आणण्याची काहीच आवश्यकता नाही. . (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x))
-
तुम्ही घरच्या घरी हे कढीपत्यासाठी खत तयार करू शकता. कढीपत्याचे खत तयार करण्यासाठी तुम्हाला घरात उपलब्ध असणारा एक पदार्थ वापरायचा आहे. कोणता आहे तो पदार्थ जो खत म्हणून कढीपत्यासाठी वापरू शकता? जाणून घेऊ या (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x)
-
कढीपत्यासाठी सर्वात चांगले खत म्हणजे घरात तयार होणारे ताक किंवा आंबट दही असते. जे दही तीन -चार दिवसापूर्वीचे झाले आहे ते वापरून तुम्ही कढीपत्यासाठी खत म्हणून वापरू शकता. हे खत वापरल्याने कढीपत्याची वाढ झटपट होते आणि त्याला किड देखील लागत नाही. (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x)
-
ताक किंवा आंबट दही वापरून कढीपत्याचे खत कसे तयार शकता?
एका बादलीत दोन-तीन दिवसापूर्वीचे थोडेसे दही घ्या.त्यातच दोन-चार मग भरून पाणी ओता आणि एकत्र करा. (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x) -
खुरपेवारून कडीपत्याच्या कुंडीतील रोपाच्या आसपासची माती मोकळी करा जेणेकरून मुळापर्यंत खत पोहचेल. (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x)
-
तयार मिश्रणाचा एक मग या रोपाला टाका.कढीपत्याच्या रोपाची चांगली वाढ होईल. (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x) -
तसेच हे पाणी गाळून घेऊन स्प्रेच्या बाटलीमध्ये टाकून घ्या. (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x)
-
त्यानंतर कढीपत्त्यावर स्प्रे करा जेणेकरून त्याला कोणीतीही कीड लागणार नाही. (फोटो सौजन्य -pixabay, एक्स(x)
कढीपत्त्यामध्ये खत म्हणून वापरा ‘हा’ घरगुती पदार्थ; झटपट होईल वाढ
कढीपत्यासाठी सर्वात चांगले खत म्हणजे घरात तयार होणारे ताक किंवा आंबट दही असते
Web Title: Buttermilk or dahi best fertilizer for kadi patta know how to grow kadi patta faster snk