-
Benefits of being silent: काही लोकांना बोलायला प्रचंड आवडतं तर काही लोकांना नाइलाजाने कामासाठी बोलावे लागते. जास्त बोलण्यामुळे शरीरातील उर्जा कमी होते हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.
-
तुम्ही कमी बोलला किंवा शांत राहिला तर तुमची उर्जा तुमच्या शरीरात साचून राहते आणि दुसऱ्या कामांसाठी वापरली जाते. त्यामुळे कधी कधी कमी बोलणे देखील तुमच्यासाठी चांगले ठरू शकते.
-
डॉक्टर्स सांगतात की, जर तुम्ही दिवसामध्ये १ तास शांत राहत असाल तर ६ मोठे फायदे होऊ शकतात.
-
शांत राहण्याचे फायदे
-
मानसिक शांती मिळते
जर तुम्ही नियमितपणे २४ तासांमधील एक तास मौन राहत असाल तर तुम्हाला मानसिक शांती मिळते. -
शांत राहण्यामुळे शरीरातील तणावाचे हॉर्मोन्स कमी तयार होतात ज्यामुळे मानसिक शांती मिळते.
-
भावनिक बंध
तुम्ही जितके शांत राहता तितकावेळ स्वत:च्या अंतरआत्म्यासह संवाद साधता. असे केल्याने तुमचे स्वत:शी एक भावनिक बंध तयार होते. -
स्वत:च्या भावनांशी जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय चूक आणि काय बरोबर यातील फरक लक्षात येतो. त्यामुळे जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मदत मिळते.
-
शांत झोप लागते
२४ तासातील १ तास शांत राहिल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. कारण तुमचे मन शांत असते त्यामुळे रात्रीच्या वेळी पटकन झोप येते. तसेच तुम्हाला गाढ झोप लागते आणि गाढ झोप लागते. -
रक्तदाब नियंत्रणात राहतो
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दिवसातून १ तास शांत राहिले हिजे त्यामुळे मन शांत होते आणि हृदयावरील ताण कमी होतो. शरीराला आराम मिळतो. नियमितपणे मौन राहण्याचा सराव केल्याने हृदय विकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर हृदयाच्या आरोग्यासंदर्भातील आजारांचा धोका काम होतो. -
रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते
कमी बोलण्यामुळे तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते. दोन्ही गोष्टींमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते ज्यामुळे आजारासह लढण्याची क्षमता वाढते. -
चांगले वक्ता होऊ शकता
जितके जास्तवेळ तुम्ही मौन राहता, तितकेच चांगले तुम्ही बोलू शकता. काही संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, शांत राहण्यामुळे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही चांगले बोलू शकता. अशावेळी तुम्ही तुमच्या शब्दाची निवडीवर विशेष लक्ष देता.
जरा शांत राहा! दिवसभरात फक्त १ तास कोणाशीच काही बोलू नका अन् तुमचे मानसिक आरोग्य सुधारा
जर तुम्ही नियमितपणे २४ तासांमधील एक तास मौन राहत असाल तर तुम्हाला मानसिक शांती मिळते
Web Title: Benefit of silence keeping quiet for 1 hour daily is good for health snk