-
असं म्हणतात, शब्दांमध्ये खूप शक्ती असते त्यामुळे नेहमी विचारपूर्वक बोलावे. (Photo : Freepik)
-
अनेकदा आपण जे बोलतो तेच कृतीत उतरवतो. त्यामुळे आपले काही शब्द आपल्याला प्रेरित करू शकतात तर काही शब्दांमुळे आपण निराश सुद्धा होऊ शकतो. (Photo : Freepik)
-
अनेकदा आपण बोलताना विचार सुद्धा करत नाही आणि अनेक नकारात्मक शब्द आपण सहज वापरतो.(Photo : Freepik)
-
काही नकारात्मक शब्दांमुळे आपल्या अवतीभोवती नकारात्मकता पसरते आणि आपण आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान गमावून बसतो. (Photo : Freepik)
-
आज आपण अशा सहा नकारात्मक शब्दांविषयी जाणून घेणार आहोत जे अनेक लोकं सर्रास वापरतात. (Photo : Freepik)
-
मला हे करावं लागेल – हे शब्द जेव्हा तुम्ही वापरता, तेव्हा इच्छा नसताना तुम्ही करताहेत, असा अर्थ होत म्हणजेच तुमचे स्वत:वर नियंत्रण नाही आणि कोणत्याही चांगल्या किंवा वाईट पद्धतीने करण्याचा विचार करत आहात. ‘मला करावं लागेल’ या शब्दांऐवजी ‘मी हे निवडले’ किंवा ‘मी हे करू शकतो’ असा शब्दांचा वापर करा. (Photo : Freepik)
-
पण – ‘पण’ हा एक छोटा शब्द आहे ‘पण’ अनेकदा कामात अडचणी निर्माण करतो. जेव्हा तुम्ही या शब्दाचा प्रयोग करता तेव्हा तुमच्या बोलण्यावर किंवा करणाऱ्या कृतीवर ठाम नसता. ‘पण’ या शब्दामुळे तुमच्या बोलण्यात नकारात्मक दिसून येते. ‘पण’ या शब्दाऐवजी ‘आणि’ या शब्दाचा उपयोग करा. (Photo : Freepik)
-
मी करू शकत नाही – जेव्हा तुम्ही म्हणता की मी करू शकत नाही. तेव्हा तुम्ही स्वत:हून अपयश स्वीकारलेले असता. कोणतीही मेहनत न घेता आधीच तुम्ही अपयश स्वीकारत असाल तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो. जर तुम्हाला एखादे काम अशक्य वाटत असेल तर ‘मी करू शकत नाही’ या ऐवजी ‘मी करणार नाही’ या शब्दांचा प्रयोग करा. (Photo : Freepik)
-
मी प्रयत्न करेन – जेव्हा तुम्ही मी प्रयत्न करेन या शब्दांचा वापर करता, तेव्हा तु समोरच्याला वचनबद्धता व्यक्त करण्यात असमर्थ आहात, असा अर्थ होतो. कोणतीही मेहनत न घेता तुम्ही अपयश स्वीकारता. ‘मी प्रयत्न करेन’ या ऐवजी ‘मी नक्की करेन’ या शब्दांचा प्रयोग करावा. (Photo : Freepik)
Personality Traits : हे नकारात्मक शब्द बोलताना शंभर वेळा विचार करा, आत्मविश्वास गमावून बसाल
अनेक नकारात्मक शब्द आपण सहज वापरतो. काही नकारात्मक शब्दांमुळे आपल्या अवतीभोवती नकारात्मकता पसरते आणि आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो.
Web Title: Think before use these negative words while talking otherwise you will loose confidence and self respect ndj