• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why does the ocean waves formed in sea know reason ndj

Sea Waves : समुद्रात लाटा का निर्माण होतात? जाणून घ्या कारण

तुम्ही अनेकदा समुद्राच्या लाटा बघितल्या असतील. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की समुद्रात लाटा का निर्माण होतात? यामागे नेमकं कारण काय आहेत, आज आपण त्या विषयी जाणून घेऊ या.

April 10, 2024 12:40 IST
Follow Us
  • Why does the ocean waves formed in sea
    1/9

    समुद्र हा अथांग असतो, जिकडे नजर जाईल तिकडे तो दूरपर्यंत पसरलेला दिसतो. प्रत्येकाला समुद्र किनारी जाऊन समुद्राला जवळून पाहावसं वाटतं. समुद्र किनारी एकमेकांवर आदळणाऱ्या लाटा, हे दृश्य खूप सुंदर वाटतं. (Photo – Freepik)

  • 2/9

    निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलंय त्यात समुद्राचे सौंदर्य हे अद्भूत आहे. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, मंद सुटलेला गार उष्ण वारा, सुर्योदय किंवा सुर्यास्ताच्या वेळी दिसणारं विलोभनीय दृश्य प्रत्येकाला पुन्हा पुन्हा पाहावसं वाटतं. (Photo – Freepik)

  • 3/9

    तुम्ही अनेकदा समुद्राच्या लाटा बघितल्या असतील. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की समुद्रात लाटा का निर्माण होतात? यामागे नेमकं कारण काय आहेत, आज आपण त्या विषयी जाणून घेऊ या. (Photo – Freepik)

  • 4/9

    समुद्रात लाटा का निर्माण होतात, असा प्रश्न कदाचित खूप कमी लोकांना पडला असेल. याचा संबध गुरुत्वाकर्षणाशी जोडलेला आहे.सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणांमांमुळे लाटा निर्माण होतात. (Photo – Freepik)

  • 5/9

    या लाटांना आपण म्हणजे भरती किंवा ओहोटी म्हणतो. या लाटा विशेषत: अमावास्या आणि पौर्णिमेला दिसून येते. समुद्राला भरती येताना त्सुनामी येऊ शकते असा एक सामान्य गैरसमज आहे. (Photo – Freepik)

  • 6/9

    https://oceanservice.noaa.gov/ च्या वेबसाइटनुसार समुद्राच्या पाण्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन लाटा तयार होतात. ही ऊर्जा वारा आणि पाण्यामध्ये घर्षणामुळे निर्माण होते. (Photo – Freepik)

  • 7/9

    जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावरून वारा खूप वेगाने वाहतो तेव्हा लाटा तयार होतात. अशाप्रकारच्या लाटा समुद्राच्या किनाऱ्यावर सहसा पाहायला मिळतात. लाटा निर्माण होण्यासाठी पाण्याचा वेग, गुरुत्वाकर्षण आणि वाऱ्याची गती इत्यादी घटक कारणीभूत असतात. त्यामुळे यापुढे जर तुम्ही कधी समुद्राच्या लाट पाहिल्या तर तुम्हाला या लाटा का निर्माण होतात, यामागील कारण समजेल. (Photo – Freepik)

  • 8/9

    तुम्ही बघितले असेल अनेकदा चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठ मोठ्या लाटा आदळताना दिसतात.अशा वादळांमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर आणि समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यावर खूप दाब निर्माण होतो ज्यामुळे लाट अधिक तीव्र होते आणि तिचे स्वरुप मोठे झाल्याचे दिसून येते. (Photo – Freepik))

  • 9/9

    याशिवाय जर समुद्रात भूकंप, भूस्खलन आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या धोकादायक लाटा समुद्रकिनारी येण्याची दाट शक्यता असते. या लाटांना ‘त्सूनामी’ म्हणतात. त्सूनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत होण्याची शक्यता असते. (Photo – Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Why does the ocean waves formed in sea know reason ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.