-
घरी आल्यावर घर नीटनेटके आणि छान सजवलेलं दिसलं की मन आपसूकच आनंदी होते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
आपल्यातील अनेकांना घर स्वछ आणि नीटनेटके ठेवण्याची खूप आवड असते. पण, रोजच्या धावपळीच्या जीवनात घर स्वछ ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.त्यामुळे घरात साफसफाई केल्यानंतर १५ ते २० दिवसात वस्तूंवर धूळ तर घरात अनेकदा पसारा सुद्धा दिसून येतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर आज आपण घर स्वछ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
संपूर्ण कुटुंबाची मदत घ्या – घर नीटनेटके ठेवण्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घ्या. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वयोमानानुसार एकेक काम सोपवा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
योग्य निवड करा – तुमचं घर स्वच्छ आणि सुव्यवस्थित दिसावे यासाठी योग्य सजावटीच्या वस्तूंची आणि फर्निचरची निवड करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
वस्तू जागच्याजागी ठेवा – तुम्ही एखादी गोष्ट वापरल्यानंतर ती पुन्हा लगेच त्याच्या जागी ठेवून द्या म्हणजे घरात पसारा होणार नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पसारा होणार नाही याची काळजी घ्या – तुमच्या वस्तू ठेवण्यासाठी बास्केट, डब्बे आणि शेल्फ आदी वस्तूंचा उपयोग करा . (फोटो सौजन्य: @Freepik )
-
एक वेळापत्रक बनवा – एक वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार स्वच्छतेच्या कामांची यादी बनवा. एका वेळी घरातील एक भाग स्वच्छ करणे अधिक सोपे होईल.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
नको असलेल्या गोष्टी फेकून द्या – पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या गोष्टी टाकून द्या. विशेषत: घराच्या कोपऱ्यांमध्ये, बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik )
House cleaning Tips: घर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सहा टिप्सची होईल मदत; नीटनेटकं दिसेल तुमचं घर
आपल्यातील अनेकांना घर स्वछ आणि नीटनेटके ठेवण्याची खूप आवड असते. पण, रोजच्या धावपळीच्या जीवनात घर स्वछ ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
Web Title: Seven cleaning tips for every room in the house create a housecleaning plan and follow this step by step tricks asp