-
आठ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जगभरातील लोकसंख्येला साक्षर बनविण्याच्या प्रयत्नांना प्रेरणा देणे हा आहे. (Photo: Pexels)
-
दरम्यान, जगातील कोणत्या देशात सर्वात कमी शिक्षित लोक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊ (Photo: Pexels)
-
जगातील सर्वात कमी साक्षरता दर असलेला देश नायजर आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण केवळ १९.०१ टक्के आहे. ही आकडेवारी UNESCO च्या सांख्यिकी विभागाची आहे जी २०१५ मध्ये सादर करण्यात आली होती. (Photo: Pexels)
-
याशिवाय जगातील सर्वात कमी साक्षरता दर असलेल्या देशांच्या यादीत अफगाणिस्तानचाही दुसऱ्या क्रमांकावर समावेश आहे. या देशाचा साक्षरता दर ३८.२ टक्के आहे. (Photo: Pexels)
-
सुदान तिसऱ्या स्थानावर आहे. या देशाचा साक्षरता दर ५८.६ टक्के आहे. (Photo: Pexels)
-
याशिवाय जगातील सर्वात कमी शिक्षित देशांच्या यादीत गिनी, बुर्किना फासो, मध्य आफ्रिकन रिपब्लिक यांचाही समावेश आहे. (Photo: Pexels)
-
या देशांव्यतिरिक्त, चाड, सिएरा लिओन आणि सायबेरियाचे लोक देखील जगातील सर्वात कमी शिक्षित लोकांमध्ये येतात. (Photo: Pexels)
-
जर आपण आपल्या देशाबद्दल म्हणजे भारताबद्दल बोललो तर येथील साक्षरता दर सुमारे ७६.३२ टक्के आहे. (Photo: Pexels)
International Literacy Day: जगातील सर्वात कमी शिक्षित लोक कोणत्या देशात राहतात, भारतातील साक्षरता दर किती?
World’s least literate country: दरवर्षी आठ सप्टेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. अशा परिस्थितीत जगातील सर्वात कमी शिक्षित लोक कोणत्या देशात राहतात हे जाणून घेऊया.
Web Title: Nternational literacy day in which country of the world do the least educated people live know what is the literacy rate in india spl