Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. protect household items from rust kitchen tips ndj

स्वयंपाकघरातील भांड्यांवर गंज चढलाय? ‘या’ पाच टिप्स लक्षात ठेवा

घरातील भांड्यांवर गंज चढू नये म्हणून खालील टिप्स जाणून घ्या.

September 12, 2024 20:40 IST
Follow Us
  • how to protect household items from rust
    1/9

    स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाच्या वस्तू म्हणजे भांडी. कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी भांड्याचा वापर केला जातो पण काही भांडी अशी असतात ज्यावर कालांतराने गंज बसतो किंवा त्या भांड्याचा खूप जास्त वापर करत नसल्यामुळे गंजतात. (Photo : Freepik)

  • 2/9

    आपण विविध प्रकारच्या धातुचे भांडी खरेदी करतो. त्यावर कालांतराने तपकिरी रंगाचा लालसर थर बसतो ज्याला आपण भांडी गंजणे असे म्हणतो. (Photo : Freepik)

  • 3/9

    पावसाळ्यात पावसामुळे थंड वातावरण असते तसेच वातावरणात दमटपणा सुद्धा जाणवतो त्यामुळे घरातील वस्तूवर गंज तयार होतो. (Photo : Freepik)

  • 4/9

    गंज ही फक्त भांडी खराब करत नाही तर व्यक्तीचे आयुष्य देखील कमी करते. त्यामुळे घरातील भांड्यांवर गंज चढू नये म्हणून खालील टिप्स जाणून घ्या. (Photo : Freepik)

  • 5/9

    भांडी कोरडी ठेवा

    अनेकदा भांडी धुतल्यानंतर आपण ती कोरडी करत नाही. भांड्यांवरील ओलावा हे गंज चढण्यामागील मुख्य कारण आहे. भांडी धुतल्यानंतर नीट कापडाने पुसा किंवा त्यावर वॉटरप्रुफ कव्हर लावा. पावसाळ्यात भांड्यावर ओलावा सहज येऊ शकतो. भांडी कोरडी व स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. (Photo : Freepik)

  • 6/9

    कोटिंग करा

    भांड्यावर गंज चढू नये म्हणून प्रभावी मार्ग म्हणून भांड्यावर कोटिंग करा. त्यासाठी तुम्ही तेल, मेण किंवा गंजपासून सुरक्षित ठेवणारे स्प्रे वापरू शकता. स्वयंपाकघरातील भांड्यांवर वनस्पती तेलाचा थर लावा. फर्निचरसारख्या मोठ्या वस्तूंवर गंज चढू नये म्हणून पेंट लावा किंवा स्प्रे मारा. (Photo : Freepik)

  • 7/9

    सिलिका जेल पॅक वापरा

    सिलिका जेल पॅक ओलावा शोषून घेण्यास मदत करतात. हे सिलिका जेल पॅक तुम्ही टूलबॉक्स किंवा ड्रॉवर किंवा स्टोरेज बॉक्समध्ये ठेवू शकता. हे पॅक खूप स्वस्त असतात आणि कोरडे केल्यानंतर पुन्हा वापरू शकता. जी भांडी गंजण्याची शक्यता असेल त्या भांड्याजवळ हे सिलिका जेल पॅक ठेवा. ओलावा दूर ठेवण्यास ते मदत करतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    भांडी नीट ठेवा

    भांड्यावरील गंज टाळण्यासाठी भांडी नीट ठेवणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. धातुच्या वस्तू थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. तळघर किंवा ओलसर ठिकाणी ठेवू नका. वापरात नसलेल्या भांड्यावर गंज चढू नये, म्हणून प्लास्टिकमध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळून ठेवा. (Photo : Freepik)

  • 9/9

    नियमित काळजी घ्या

    पावसाळ्यात धातूच्या भांड्याची नीट काळजी घ्या. भांड्यावर गंज चढू नये म्हणून सतर्क राहा. बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण वापरून गंज काढून घ्या. भांड्यावर गंज चढू नये म्हणून कोटिंग करा. (Photo : Freepik)

TOPICS
टिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Protect household items from rust kitchen tips ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.