• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do these three powerful measures to get rid of mosquitoes sap

डासांचा नायनाट करण्यासाठी करा ‘हे’ तीन जबरदस्त उपाय

घरातील डासांपासून दूर राहण्यासाठी लोक विविध उपाय करीत असतात. अनेक जण डासांना मारण्यासाठी कॉइल जाळतात, स्प्रे किंवा जंतुनाशकाची फवारणी करतात. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

Updated: October 15, 2024 16:29 IST
Follow Us
  • powerful measures to get rid of mosquitoes
    1/9

    कोणताही ऋतू असला तरी डासांची संख्या वाढतानाच दिसते आणि त्यामुळे आपण सर्वच हैराण होतो. खेड्यापासून मोठमोठ्या शहरांपर्यंत प्रत्येक ठिकाणी डासांची दहशत पाहायला मिळते. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

  • 2/9

    अनेक उपाय करूनही डासांची ही पैदास कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना मलेरिया, डेंग्यू अशा जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच आज आम्ही डासांना दूर पळवून लावण्यासाठी काही उपाय तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

  • 3/9

    घरातील डासांपासून दूर राहण्यासाठी लोक विविध उपाय करीत असतात. अनेक जण डासांना मारण्यासाठी कॉइल जाळतात, स्प्रे किंवा जंतुनाशकाची फवारणी करतात. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

  • 4/9

    परंतु, एवढे केल्यानंतर डास काही प्रमाणात कमी झाल्यासारखे वाटले तरी त्यांचा त्रास सुरूच राहतो. जर तुमच्याही घरात दररोज डास येत असतील, तर तुम्ही काही उपाय करून त्यांना दूर पळवून लावू शकता. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

  • 5/9

    कडुलिंबाच्या पानांद्वारे तुम्ही डासांना सहज दूर पळवू शकता. सर्वप्रथम कडुलिंबाची पाने घ्या आणि ती नीट धुऊन, त्यांची पेस्ट बनवा. त्यात कापूरही टाका. आता ते पाण्याच्या मदतीने थोडे पातळ करा. पातळ केल्यानंतर कापडाच्या मदतीने गाळून घ्या. त्यात खोबरेल तेल मिसळून चांगले मिश्रण तयार करा. हे मिश्रण तुम्ही रिकाम्या स्प्रे बाटलीत भरून वापरू शकता. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

  • 6/9

    लसणामध्ये सल्फर असल्यामुळे त्यात डासांना दूर ठेवणारे गुण आहेत. लसणाचा रस या कीटकांसाठी घातक आहे. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

  • 7/9

    डासांना दूर करण्यासाठी लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या पाण्यात उकळवा, ते पाणी थंड होऊ द्या आणि नंतर ते पाणी स्प्रे बाटलीत भरा. मग संपूर्ण घरात या कीटकनाशक पाण्याची फवारणी करा. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

  • 8/9

    डास दूर करून स्वतःसह घरातल्यांचे संरक्षण करण्यासाठी लव्हेंडर, कडुलिंब, सिट्रोनेला, निलगिरी व पुदीना यांपैकी एखादे तेल वापरा. एका स्प्रे बाटलीत यातील एका तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळा आणि ते तुमच्या घरात शिंपडा. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

  • 9/9

    तसेच तुमच्या संरक्षणासाठी कडुलिंबाचे तेल, खोबरेल तेल व लव्हेंडर तेलाचे काही थेंब एकत्र करून, अशा संमिश्रित तेलयुक्त पाण्याचा स्प्रे तयार करून, त्याची सर्वत्र फवारणी करा. (फोटो सौजन्य: Loksatta.com)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Do these three powerful measures to get rid of mosquitoes sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.