-
Summer Travel Tips : जर तुम्ही तुमच्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फुल धमाल करता येईल अशी ठिकाणी घेऊन जाण्याचा विचर करत असाल तर तुमच्यासाठी सिक्कीम हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. याची अनेक कारणे आहेत, पहिले म्हणजे, सिक्कीमला भेट देण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे आणि दुसरे म्हणजे, येथे तुम्ही निसर्ग सौंदर्यापासून ते साहसी खेळांपर्यंत अनेक गोष्टींचा मनमुराद आनंद घेऊ शकता. सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. (छायाचित्र-एक्स)
-
सिक्कीममध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, पण पेलिंग हे शहर या सर्वांमध्ये वेगळे ठरते. सिक्कीममधील एका छोट्या टेकडीवर वसलेल्या या शहरात तुम्हाला बर्फाच्छादित पर्वतरांगा पाहायला मिळात. पण मे आणि जूनमध्ये ही हिम शिखरे पाहण्यासारखी असतात. (छायाचित्र-विकिपीडिया)
-
स्काय वॉक, पेलिंग, सिक्कीम: पेलिंगचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ग्लास स्काय वॉक. ७२०० फूट उंचीवर असलेला हा काचेच्या पुलावर गेल्यानंतर येथून तुम्हाला दिसणारे दृश्य अद्भुत आहे. या स्काय वॉकवर चालताना लोक खाली पाहतात तेव्हा त्यांचे पाय थरथरायला लागतात. खूप उंचीवर असल्याने येथे खूप थंडी पडते. हा काचेचा पूल फक्त सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुला असतो. (छायाचित्र-विकिपीडिया)
-
पेमायांगत्से मठ: पेमायांगत्से हा सिक्कीममधील सर्वात जुना आणि प्रसिद्ध मठ आहे. पेमायांगत्से मठ एका टेकडीवर आहे. येथे पोहोचल्यानंतर, आजूबाजूच्या परिसराचे एक विहंगम दृश्य पाहायला मिळते. या मठा बाह्य सौंदर्य पाहण्यासारखे आहे आणि तुम्ही आत बसून ध्यान देखील करू शकता. पेमायांगत्से मठाच्या दिशेने जाताना, तुम्हाला कांचनजंगा पर्वतरांगा देखील पाहायला मिळतात. (छायाचित्र-विकिपीडिया)
-
खेचेओपलरी तलाव : पेलिंगचे खेचेओपलरी तलाव हे देखील येथील प्रमुख आकर्षण आहे. हे सरोवर भगवान पद्मसंभव यांच्या आशीर्वादासाठी देखील ओळखले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की फक्त या तलावाकडे पाहूनच त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. हा फक्त बौद्धांसाठीच नाही तर हिंदूंसाठीही एक पवित्र तलाव आहे. (छायाचित्र-विकिपीडिया)
-
पेलिंगला भेट देण्यासाठी सर्वोत्तम हंगाम कोणता? जर तुम्ही पेलिंगला भेट देण्याचा विचार करत असाल तर उन्हाळा हा त्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. मे आणि जूनमध्ये तुम्ही येथे आरामात फिरू शकता. (छायाचित्र-विकिपीडिया)
Summer Travel Tips : उन्हाळ्यात फिरायला जाण्याचं नियोजन करताय? ‘हे’ ठिकाण ठरू शकतं सर्वोत्तम पर्याय
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही सिक्कीममध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.
Web Title: Summer travel tips best place to travel in vacation pelling is like a paradise for adventure enthusiasts ap ieghd import rak