• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. baking soda helps the body detox sap

बेकिंग सोडा शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…

Baking Soda: इन्स्टाग्रामवर एक व्हायरल रील समोर आली आहे, त्यामध्ये असा दावा केला गेलाय की, पिण्याच्या पाण्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

April 28, 2025 18:26 IST
Follow Us
  • Baking soda helps the body detox
    1/9

    काही वर्षांपासून भारतातील शेती उद्योगात कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची चिंता निर्माण झाली आहे. उत्पादनांवर अल्कधर्मी वॉश आणि सेंद्रिय लेबले लावली जात असली तरी कीटकनाशकांच्या विषारी परिणामांमुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    अलीकडेच, इन्स्टाग्रामवर एक व्हायरल रील समोर आली आहे, त्यामध्ये असा दावा केला गेलाय की, पिण्याच्या पाण्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. “कारण त्यात ग्लायफोसेटची खूप जास्त ओढ असते, जी राउंडअप असते”.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    व्हिडीओमधील कंटेंट क्रिएटरच्या मते, “तुम्ही जरी सेंद्रिय पदार्थ खाल्ले आणि फिल्टर केलेले पाणी प्यायले तरी ग्लायफोसेट हे एक असे न्यूरोटॉक्सिन आहे, जे लिम्फोमा, कर्करोग, पार्किन्सन आणि अगदी एमएस यांसारख्या गोष्टींशी जोडलेले आहे”. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    पॅकेजिंगवर एक नजर टाकल्यास दोन्ही उत्पादनांमधील फरक दिसून येतो. बेकिंग सोड्यात सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हा एक घटक असतो. त्याला सोडियम बायकार्बोनेट किंवा फक्त बायकार्ब, असेही म्हणतात. बेकिंग सोडा स्वच्छता, स्वयंपाक आणि एक दुर्गंधीनाशक पदार्थ म्हणून वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    चेन्नईतील प्रॅग्मॅटिक न्यूट्रिशनच्या मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी म्हणाल्या की, ग्लायफोसेट हे अनेक देशांमध्ये वापरले जाणारे तणनाशक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9


    पचन समस्या आणि कर्करोग होण्याचा धोका वाढण्याशी त्याचा संबंध असल्याने अलीकडच्या काळात त्यावर टीका झाली आहे .(फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    “काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, बेकिंग सोडा उत्पादनाच्या पृष्ठभागावरून ग्लायफोसेट काढून टाकू शकतो. कारण- ग्लायफोसेट अल्कधर्मी माध्यमात स्थिर नाही; परंतु याचे आमच्याकडे ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9


    जरी बेकिंग सोडा पृष्ठभागावरून ग्लायफोसेट काढून टाकत असला तरी ग्लायफोसेट एक तणनाशक आहे. याचा अर्थ असा की, ते ऊतींमध्ये आणि वनस्पतीच्या इतर भागांमध्येदेखील आढळते,” असे ती म्हणाली. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Baking soda helps the body detox sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.