-
गोकर्ण हे कर्नाटकातील एक अत्यंत आकर्षक मंदिर असलेले शहर आहे, जे त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि कमी गर्दीसाठी प्रसिद्ध आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले, गोकर्ण हे संस्कृत शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
-
गोकर्ण येथील स्थानिक रहिवाशांची पारंपारिक जीवनशैली आणि त्यांचा मनमिळाऊ स्वभाव गोकर्णला एक उत्तम पर्यटनस्थळ बनवतो. येथे असणारे हाफ मून आणि पॅरडाइज यांसारखे प्रसिद्ध समुद्रकिनारे तुम्ही कुठेही पाहिले नसतील. गोकर्णमध्ये फक्त सुंदर समुद्रकिनारेच नाहीत तर येते तुम्ही आणखीही बरेच काही अनुभवू शकता. येथे गेलात तर महाबळेश्वर मंदिर, मिर्जान किल्ला आणि याना लेण्यांना भेट द्यायला विसरू नका. (स्रोत-विकिमीडिया कॉमन्स)
-
आसाममधील माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीतील बेट आहे. ब्रह्मपुत्रा नदीने वेढलेले माजुली हे खरोखरच आसामचा आत्मा आहे. माजुली हे आसामी नव-वैष्णव संस्कृतीचे केंद्र आहे आणि पारंपारिक पद्धती आणि पर्यावरणीय महत्त्व यांचे मिश्रण येथे पाहायला मिळते. जर तुम्ही शांतता शोधत असाल तर येथील सुंदर लँडस्केप, ग्रामीण जीवन आणि वनस्पती आणि प्राण्यांची समृद्ध जैवविविधता तुमच्यासाठी पर्वणी ठरेल. माजुलीमध्ये सत्र, रास महोत्सव आणि समगुरी सत्र येथे मुखवटे बनवणे यासह अनेक पर्यटन आकर्षणे तुम्ही अनुभवू शकता. (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
-
“बुंदी पॅलेस, दिवसा उजेडातही, जणू काही माणसाने त्याची अपूर्ण स्वप्ने सजवली आहेत असे दिसते. हे माणसाने नाही तर एका जिनीने बांधले आहे. परीकथा आणि सिंड्रेलाच्या काळातील राजवाडे आणि किल्ले असलेले बुंदीचे आकर्षण शतकानुशतके कमी झालेले नाही.” रुडयार्ड किपलिंग यांचे हे प्रसिद्ध शब्द बुंदीचे जादुई सौंदर्याचे वर्णन करतात – राजस्थानमधील एक भव्य पण कमी माहिती असलेले शहर, समृद्ध ऐतिहासिक वैभवाने भरलेले आहे. (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
-
बुंदीमध्ये एक्सप्लोर करण्यासाठी असंख्य ठिकाणे आहेत. काही उल्लेखनीय स्थळांमध्ये प्लेजर पॅलेस, केसर बाग, राणी जी की बाओरी, नगर सागर कुंड, ८४ स्तंभांची छत्री आणि भव्य तारागढ किल्ला यांचा समावेश आहे. हे शहर जैत सागर तलाव, नवल सागर तलाव आणि जनक सागर तलाव यासारख्या नयनरम्य तलावांनी वेढलेले आहे. राजवाड्यांव्यतिरिक्त बुंदी त्याच्या पारंपारिक हस्तकलांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये चित्रे, मातीची भांडी आणि सुंदर कापड यांचा समावेश आहे. (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
-
चेट्टीनाड हे शहर तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात वसलेले आहे. या जागेला एक समृद्ध वारसा लाभलेला असून येथे तुम्ही भव्य वास्तुकला, वेगवेगळ्या स्वादिष्ट पाककृती आणि आकर्षक कलेचा आनंद घेऊ शकता. या छोट्या शहरात अनेक राजवाडे आणि वाड्या सोडून देण्यात आल्या आहेत ज्यातून समृद्धी आणि भव्यता दिसून येते. त्याची समृद्ध संस्कृती, स्वादिष्ट पाककृती आणि अद्वितीय वास्तुकला चेट्टीनाडला एक अविस्मरणीय पर्यटनस्थळ बनवते. (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
-
चेट्टीनाडच्या अनुभव घेण्यासाठी, बंगाला या ठिकाणाला भेट देऊ शकता जे भव्य वाडे आणि प्राचीन मंदिरांनी वेढलेली आहे जी या प्रदेशाच्या समृद्ध स्थापत्य आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवते. (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
-
अरुणाचल प्रदेशातील झिरो हा हिरवागार प्रदेश स्वर्गहून सुंदर आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १,५०० मीटर उंचीवर वसलेले एक हिल स्टेशन आहे. विस्तीर्ण भातशेती, पाइन वृक्षांनी झाकलेल्या टेकड्या आणि घनदाट हिरव्यागार जंगलांसाठी झिरो प्रसिद्ध आहे. (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
-
झिरो खोऱ्यात राहणारी अपातानी जमात, भातशेती आणि त्याबरोबरीने केले जाणारे मत्स्यपालन याच्या अद्वितीय पद्धतींसाठी ओळखली जाते. हे विलक्षण आणि नयनरम्य शहर त्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत देखील नोंदवले गेले आहे. (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)
Offbeat Travel India : भारतीय शहरे ज्यांचं नाव तुम्ही ऐकलं नसेल, पण आयुष्यात एकदातरी भेट नक्की दिली पाहिजे
lesser known Indian towns : खूप कमी लोकांना माहिती अशलेली ही भारतीय शहरे शांतताप्रिय पर्यटकांसाठी चांगाल पर्याय ठरू शकतात.
Web Title: 5 indian towns youve probably never heard of but should visit iehd import rak