-
रोज एक सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवतो ही ओळ तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, निसर्गाकडे अशीही जादूची शक्ती आहे जी न्यूरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, त्वचारोगतज्ज्ञ अशा सगळ्या प्रकारच्या डॉक्टरांपासून दूर ठेवते.
-
नियमित आणि योग्य प्रमाणात खाल्ली गेलेली काही फळं आणि सुकामेवा तुमचं आरोग्य इतकं बळकट करू शकतात की वेगवेगळ्या तज्ज्ञांकडे जाण्याची गरजच भासणार नाही.
इथे आहेत निसर्गाने दिलेले १० आरोग्यदायी सुपरफूड्स, जे योग्य प्रमाणात घेतल्यास तुमचं हृदय, मेंदू, त्वचा आणि पचनतंत्र सर्व काही तंदुरुस्त ठेवतील. -
नारळ (१५ ग्रॅम किंवा १ टेबलस्पून)
न्यूरोलॉजिस्टला ठेवा दूर!
मेंदूला बूस्ट देणारा नारळ आरोग्यदायी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला आहे. तो मेंदूचं संरक्षण करतो आणि न्यूरोडीजनरेटिव्ह आजारांपासून दूर ठेवतो. -
अक्रोड (२ संपूर्ण दाणे)
मानसिक तणाव? विसरून जा!
ओमेगा-३ ने भरलेले अक्रोड मन प्रसन्न ठेवतात आणि चिंता, नैराश्य दूर करण्यास मदत करतात. -
आवळा (१ छोटा ताजा किंवा १ चमचा पावडर)
रोग दूर, ताकद भरपूर!
आवळा नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि वारंवार होणारे आजार दूर ठेवतो. -
केळी (१ मध्यम आकाराचे)
पोट शांत, तब्येत छान!
पचन सुधारणारी आणि आम्लता कमी करणारी केळी तुमचं आतड्यांचं आरोग्य जपते. -
अंजीर (१ भिजवलेले)
साखर नियंत्रणात, हार्मोन्स संतुलित!
अंजीर रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो आणि हार्मोनल संतुलन राखतो. -
खजूर (१ तुकडा)
ऊर्जा वाढवा, अशक्तपणा दूर ठेवा!
लोहाने भरलेला खजूर थकवा दूर करतो आणि रक्तातील ताकद टिकवतो. -
डाळिंब (अर्धा कप बिया)
हृदय मजबूत, रक्तदाब नियंत्रणात!
डाळिंब हृदयाचं रक्षण करतं आणि रक्तदाब घटवण्यास मदत करतं. -
पिस्ता (५ दाणे)
मूत्रपिंड तंदुरुस्त, शरीर स्वच्छ!
पिस्ता मूत्रपिंडाचं कार्य सुधारतो आणि मूत्राशय निरोगी ठेवतो. -
बदाम (५ दाणे)
त्वचा उजळ, कोरडेपणा दूर!
व्हिटॅमिन ईने भरलेले बदाम त्वचेला पोषण देतात आणि ती मऊ व निरोगी ठेवतात. -
पपई (१ कप)
यकृत (लिव्हर) साफ, पचन बिनधास्त!
पपई यकृताला (लिव्हरला) डिटॉक्स करते आणि पचन व चरबीच्या चयापचयात मदत करते. -
टीप :
निसर्गाचे वरदान जरी अमूल्य असले, तरी ते सर्वांसाठी सारखेच फायदेशीर असतात असे नाही. विशेषतः मधुमेहींनी खजूर आणि अंजीर टाळावेत. कोणताही आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर यांचा सल्ला न घेता आहारात मोठा बदल करू नका.
आरोग्यासाठी नैसर्गिक पर्याय निवडणं नक्कीच शहाणपणाचं ठरतं फक्त ते योग्य प्रमाणात आणि जाणीवपूर्वक घ्या.
सफरचंदचं नाही तर ‘हे’ १० नैसर्गिक सुपरफूड्स तुम्हाला डॉक्टरांपासून ठेवतील दूर
अन्न म्हणजे औषध: निसर्गाने आपल्याला अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत ज्या शरीराच्या प्रत्येक भागाचे पोषण करून रोगांपासून आपले संरक्षण करू शकतात. कोणती नैसर्गिक गोष्ट आपल्याला कोणत्या तज्ञ (डॉक्टर) पासून वाचवू शकते हे जाणून घेऊया – योग्य प्रमाणात जाणून घेण्यासोबतच.
Web Title: These 10 natural superfoods can keep doctors away svk 05