• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mehndi designs for one shoulder and off shoulder dresses special occasion svk

Mehndi Designs: वन शोल्डर ड्रेससाठी ‘या’ खास मेहंदी डिझाईन्स; पारंपरिकतेला मॉडर्न ट्विस्ट!

खास प्रसंगी वन शोल्डर किंवा ऑफ शोल्डर ड्रेस घालायचा असेल, तर त्या लूकला पूरक ठरतील अशा ट्रेंडी, एलिगंट व फ्युजन मेंदी डिझाइन्स नक्की ट्राय करा. स्टाईल आणि परंपरेचा परफेक्ट मिलाफ!

June 26, 2025 14:10 IST
Follow Us
  • Minimalist Mehndi for Party
    1/20

    लग्न, रिसेप्शन किंवा कोणत्याही खास दिवशी मुली पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही लूकना पसंती देतात. अशा वेळी ड्रेससह जुळणारी मेंदीदेखील तितकीच खास असावी लागते.

  • 2/20

    वन शोल्डर किंवा ऑफ शोल्डर ड्रेस घालायचा प्लॅन असेल, तर हातावरची मेंदीसुद्धा तशीच स्टायलिश आणि क्लासी दिसली पाहिजे. डिझाईन निवडताना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.

  • 3/20

    आजच्या काळात अशा अनेक मेंदी डिझाइन्स उपलब्ध आहेत, ज्या मॉडर्न पोशाखांशी मस्त जुळून येतात. या डिझाइन्समुळे तुमचा संपूर्ण लूक अजूनच रॉयल आणि खास वाटेल.

  • 4/20

    वन शोल्डर ड्रेस असो किंवा ऑफ शोल्डर गाऊन, त्यावर शोभून दिसणाऱ्या काही खास आणि ट्रेंडिंग मेंदी डिझाइन्स आज इथे पाहा. लूक होईल अगदी परफेक्ट.

  • 5/20

    साइड फोकस्ड मेंदी – एका बाजूचा खास अंदाज!
    जर तुमचा ड्रेस एका खांद्याचा असेल आणि एक बाजू उघडी असेल, तर त्या बाजूला लक्ष वेधणारी मेंदी डिझाईन निवडा. एक हात भरून सुंदर डिझाईन ठेवा आणि दुसऱ्या हातावर साधा, मिनिमल पॅटर्न. हा साइड फोकस लूक पार्टी लूकसाठी परफेक्ट वाटतो..

  • 6/20

    बुटीक ब्रायडल बेल – परंपरेत ट्रेंडचा टच
    हाताच्या एका बाजूने बोटांपासून बेल डिझाईन खालीपर्यंत येते, ज्यात काही जागा मोकळी सोडली जाते. ही स्टाईल खास अशा वधूसाठी जी परंपरा आणि मॉडर्न लूक एकत्र हवा आहे. ही मेंदी क्रीम आणि ऑफ शोल्डर लेहंग्यासोबत कमालीची दिसते.

  • 7/20

    मिड पाम आर्ट – थोडं; पण शाही!
    तळहाताच्या मध्यभागी फक्त एक सुंदर कमळ, मोर किंवा मंडल पॅटर्न. एकटाच डिझाईन; पण क्लासी आणि रॉयल लूक देतो. ऑफ-शोल्डर ड्रेससह असा सिंगल पॉइंट मेंदी स्टाईल ट्रेंडी आणि एलिगंट वाटतो.

  • 8/20

    दागिन्यांसारखी मेंदी
    मनगटावर बांगडीसारखी किंवा साखळी पद्धतीची मेंदी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. ही डिझाईन खासकरून अशा वेळी उठून दिसते, जेव्हा तुम्ही ऑफ-शोल्डर गाऊन घातला असेल आणि दागिने कमी वापरले असतील. हातांवर असे पॅटर्न्स एकदम रॉयल लूक देतात.

  • 9/20

    बोटांपुरती मेंदी
    केवळ बोटांवर केलेली स्टायलिश मेंदी हलक्या लूकसाठी परफेक्ट आहे. विशेषतः जड कपडे घातले असतील, तर हे मिनिमल डिझाईन खूपच एलिगंट दिसते. बोटांवर बारकावे असतात आणि तळहात साधा ठेवलेला असतो.

  • 10/20

    फुलांच्या स्पर्शासह अरबी डिझाईन
    एक खांदा असलेल्या गाऊनसाठी फुलांचे अर्धवट डिझाईन आणि वाहत्या वेलांनी सजलेली अरबी मेंदी अतिशय मोहक दिसते. ही मेंदी शाही व नाजूक लूक देते आणि हातांचे सौंदर्य वाढवते.

  • 11/20

    खांद्यापर्यंत मेंदी ट्रेल
    तुम्ही काही हटके डिझाईन शोधत असाल, तर मनगटापासून खांद्यापर्यंत जाणारी वेलीसारखी ट्रेल मेंदी नक्कीच निवडा. वन शोल्डर ड्रेससोबत ही डिझाईन खूपच हटके आणि आकर्षक वाटते.

  • 12/20

    साधेपणात सौंदर्य – मिनिमल वधू मेंदी
    सौम्य आणि सौंदर्यपूर्ण लूक हवा असेल, तर ही डिझाईन योग्य ठरेल. प्रत्येक बोटावर छोटा पॅटर्न, तळहाताच्या मधोमध साधी डिझाईन आणि मनगटावर हलकीशी वेल हा संपूर्ण लूक सोज्वळ; पण स्टायलिश वाटतो.

  • 13/20

    हातमोजे डिझाइन मेंदी
    ही मेंदी डिझाइन हातावर अशा पद्धतीने लावली जाते की, ती नेट किंवा लेसचे ग्लोव्हज घातल्यासारखी वाटते. गाऊनसारख्या ड्रेससोबत हा लूक खूपच एलिगंट दिसतो.

  • 14/20

    रिव्हर्स स्पेस मेंदी
    या डिझाइनमध्ये काही भाग रिकामाच ठेवला जातो. त्यामुळे फुले, वेलबुट्ट्या किंवा आकृत्या अजून उठून दिसतात. क्रिएटिव्ह आणि ट्रेंडी लूकसाठी उत्तम!

  • 15/20

    नेट आणि चेक्स पॅटर्न
    हातावर चेक्स किंवा जाळीदार पद्धतीने मेंदी लावली जाते. एका खांद्याच्या ड्रेससोबत ही स्टाईल खूपच शोभून दिसते आणि हात सडपातळ भासतो.

  • 16/20

    अंगठी-ब्रेसलेट स्टाईल
    या डिझाइनमध्ये बोटांपासून मनगटापर्यंत साखळी जोडलेल्या अंगठी आणि ब्रेसलेटसारखा लूक तयार होतो. दागिने न घालता मेंदी एक सुंदर पर्याय बनतो.

  • 17/20

    खांद्यावरची मेंदी
    असामान्य पण हटके लूक हवा असेल, तर खांद्यावर मेंदी लावण्याचा विचार करा. फुलं, मंडला डिझाइनसह हा प्रयोग गाऊन किंवा ऑफ-शोल्डर आउटफिटला परफेक्ट मॅच देतो.

  • 18/20

    टॅटूसारखी मेंदी अन् हटके लूक
    जेव्हा तुम्ही ऑफ-शोल्डर गाऊन घालता आणि खांद्याचा भाग दिसतो, तेव्हा अशा ठिकाणी लावलेली मेंदी टॅटूसारखी भासते. पार्टी किंवा फोटोशूटमध्ये ही डिझाईन तुमचा लूक एकदम खास आणि लक्षवेधी बनवतो.

  • 19/20

    एक खांदा, रॉयल स्टाईल
    वन शोल्डर ड्रेस आणि त्याचाशी जुळणारी सुंदर मेंदी डिझाईन तुमच्या स्टाईलला रॉयल टच देते. हा कॉम्बो ट्रेंडी लूकसाठी परफेक्ट आहे.

  • 20/20

    स्टायलिश फ्युजन लूक
    पाश्चिमात्य पोशाख आणि हटके मेंदी डिझाईन एकत्र आल्यावर तुमचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतो. खास प्रसंगी यापैकी एक डिझाईन नक्की करून बघा.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Mehndi designs for one shoulder and off shoulder dresses special occasion svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.