-
पूर्वीच्या स्वयंपाकघरांमधील तांब्या-पितळेच्या भांड्यांची जागा आता हल्लीच्या स्टील, नॉनस्टीक, अॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली आहे. परंतु, पूजेमध्ये तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर विशेष केला जातो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कालांतराने ही भांडी काळी पडतात, ज्यामुळे त्यांची चमक कमी होते. बरेच लोक तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनांचा वापर करतात, जे हानिकारकदेखील असू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने भांडी स्वच्छ करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी प्रथम ती कोमट पाण्याने धुवा, जेणेकरून त्यावर असलेली घाण निघून जाईल. आता एक आंब्याची साल घ्या आणि त्याचा आतील भाग काळ्या झालेल्या भांड्यावर घासून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आंब्याची साल भांड्यावर घासताना त्याचा रस भांड्यावर चांगला लागेपर्यंत घासा. आता भांडी ५-१० मिनिटे तशीच राहू द्या. आता ती स्क्रबर किंवा ब्रशच्या मदतीने स्वच्छ करून काही वेळ उन्हात वाळवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आंब्याच्या सालीत कोणतीही रसायने नाहीत, त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. ते वापरल्यानंतर कोणत्याही रासायनिक क्लिनरची गरज लागत नाही. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आंब्याच्या सालीने भांडी स्वच्छ केल्यानंतर त्याची चमक अनेक दिवस टिकून राहते. आंब्याच्या सालीबरोबर मीठ किंवा बेकिंग सोडा वापरा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्हाला भांडी आणखी चमकदार आणि नव्यासारखी स्वच्छ करायची असतील तर तुम्ही त्यात मीठ आणि बेकिंग सोडा वापरू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आंब्याच्या सालीमध्ये नैसर्गिक अॅसिड असते, जे मीठ आणि बेकिंग सोड्यासह मिळून हट्टी डाग सहजपणे काढून टाकतात. ते स्वच्छ करण्यासाठी प्रथम ते भांड्यावर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. आता ते स्क्रबरने हलके घासून पाण्याने स्वच्छ करा. (फोटो सौजन्य: Freepik)
काळपट तांब्या-पितळेची भांडी ‘या’ सोप्या पद्धतीने कर चकाचक
Copper Vessel Cleaning: तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनांचा वापर करतात, जे हानिकारकदेखील असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने भांडी स्वच्छ करू शकता.
Web Title: Copper vessel cleaning tips home remedies sap