-
चाणक्यांनी मांडलेली तत्त्वे आजच्या काळातही जीवनाला योग्य दिशा दाखवतात.
-
जरी चाणक्य युगांपूर्वीचे विचारवंत होते, तरीही त्यांचे विचार आजच्या युगातही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांनी दिलेले तत्त्वज्ञान आणि अनुभव आजच्या तरुणांनीही अवश्य समजून घ्यावेत, असे आहेत.
-
चाणक्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, तारुण्य ही अशी वेळ असते, जिथे घेतलेले निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्याचा आधार बनतात. या काळात चुकल्यास, संधी पुन्हा मिळेलच याची शाश्वती नाही.
-
१. वेळेचा अपव्यय – यशाचा सर्वांत मोठा शत्रू
चाणक्य म्हणतात, “वेळेचं व्यवस्थापन हे यशाचं मूळ आहे.” जो तरुण वेळ वाया घालवतो, तो भविष्यात कितीही मेहनत केली तरी मागेच राहतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
२. फक्त नशिबावर अवलंबून राहणे – अपयशाला निमंत्रण
चांगलं नशिब असणं महत्त्वाचं आहे; पण त्यावरच अवलंबून राहणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. मेहनत आणि कौशल्याशिवाय यश अशक्य आहे, असं चाणक्य सांगतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
३. वाईट संगती – यशातील मोठा अडथळा
वाईट सवयी आणि चुकीची मैत्री माणसाला विनाशाकडे नेऊ शकते; तर चांगली संगत हा यशाकडे नेणारा खरा मार्ग आहे, हे चाणक्य वारंवार बजावतात. (Photo : Freepik) -
४. भविष्याचा विचार न करणं – निष्काळजीपणाचं मोठं नुकसान
तारुण्य म्हणजे फक्त मजा करण्याचा काळ नाही, तर भविष्य घडवण्याची संधी आहे. जो तरुण विचार न करता जगतो, तो शेवटी परिस्थितीपुढे हतबल होतो. (छायाचित्र: अनस्प्लॅश) -
५. शिस्तीचा अभाव – यशाच्या मार्गातील अडथळा
चाणक्यांच्या मते, शिस्त ही कोणत्याही यशस्वी माणसाची पहिली ओळख असते. शिस्तीशिवाय कौशल्य, मेहनत व बुद्धिमत्ता हेसुद्धा निष्फळ ठरू शकतात. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
चाणक्य नीतीत सांगितलेल्या ‘या’ पाच चुका, ज्या तरुणांनी टाळायलाच हव्यात
चाणक्य नीतीनुसार, तारुण्यात केलेल्या पाच प्रमुख चुका आयुष्यभर पश्चात्ताप देऊ शकतात. वेळेचा अपव्यय, नशिबावर अवलंबून राहणे, वाईट संगती, भविष्यासाठी नियोजनाचा अभाव व शिस्तीची कमतरता या गोष्टी टाळल्यास यश प्राप्त करणे सहज शक्य आहे. चाणक्यांचे हे विचार आजच्या तरुणांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतात.
Web Title: Chanakya niti 5 mistakes youth should avoid for success svk 05