-
बदललेल्या जीवनशैलीचा यकृतावर परिणाम
आपले दैनंदिन आयुष्य झपाट्याने बदलत आहे. सततची धावपळ, तळलेले अन्न आणि उशिरा झोपण्याची सवय यांमुळे शरीराचे अंतर्गत आरोग्य ढासळते. त्याचा सर्वाधिक परिणाम आपल्या यकृतावर होतो, जो आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. -
यकृत कमजोर झाल्यास संपूर्ण आरोग्यावर दुष्परिणाम!
यकृत केवळ अन्न पचवत नाही, तर शरीरातील विषारी घटकही बाहेर टाकून रक्त शुद्ध करते. मात्र, जेव्हा यकृत कमकुवत होते, तेव्हा थकवा, अपचन, झोपेचा त्रास आणि गंभीर आजार वाढण्याचा धोका निर्माण होतो. -
यकृतासाठी योगाचा प्रभाव
योगामुळे यकृताचे आरोग्य सुधारते आणि ते नैसर्गिकरीत्या मजबूत होते. ही प्राचीन भारतीय पद्धत यकृताला विषमुक्त करते, त्याची कार्यक्षमता वाढवते आणि औषधांशिवाय शरीरात संतुलन निर्माण करते. -
यकृतासाठी ‘ही’ आसने ठरतात वरदान
योगतज्ज्ञ सांगतात की, भुजंगासन, धनुरासन, नौकासन व पवन मुक्तासन यांसारखी आसने यकृताच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ही आसने यकृताभोवतीचे स्नायू सक्रिय करतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि यकृताच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत करतात. -
भुजंगासन : यकृताला मिळते नैसर्गिक मसाज
भुजंगासन करताना शरीर सापासारखे दिसते. हे यकृत आणि स्वादुपिंडावर सौम्य दाब टाकते, ज्यामुळे पचन सुधारते आणि यकृतातील रक्तप्रवाह वाढतो. दररोज काही सेकंदे हे आसन केल्याने शरीरात ऊर्जा येते आणि ताजेपणा जाणवतो. -
नौकासन : पोटाची चरबी आणि यकृत दोघांवर परिणाम!
नौकासन करताना शरीराचा आकार एका सरळ बोटासारखा दिसतो. ही स्थिती यकृत, मूत्रपिंड व पचनसंस्था यांना सक्रिय करते. त्यामुळे पचन सुधारते, पोटाचा ताठरपणा कमी होतो आणि शरीर हलके झाल्यासारखे वाटते. -
धनुरासन : यकृतासाठी शक्तिवर्धक आसन
धनुरासन करताना शरीर धनुष्यासारखे दिसते. हे आसन यकृताचे स्नायू ताणून, त्याची कार्यक्षमता वाढवते. त्यामुळे पचन सुधारते, यकृतात रक्तप्रवाह वाढतो आणि नियमित सरावाने शरीर अधिक मजबूत होते.
यकृतासाठी वरदान ठरणारी ‘ही’ तीन योगासने! जाणून घ्या फायदे आणि पद्धती
दैनंदिन धावपळीच्या जीवनशैलीमुळे यकृतावर परिणाम होत असून, त्याचे आरोग्य बिघडू शकते. पण भुजंगासन, नौकासन, धनुरासन यांसारखी काही योगासने यकृतासाठी वरदान ठरू शकतात.
Web Title: Easy yoga poses that boost liver health benefits and steps svk 05