-
रात्री शांत झोप येत नाही? खोली थंड ठेवली, दिवे मंद केले, फोनही दूर केला… तरीही झोप लागत नाही? याला कारण कदाचित तुमच्या ताटातील पदार्थ असू शकतील. काही अन्नपदार्थ दिसायला सर्वसाधारण दिसत असले तरी ते तुमच्या झोपेच्या नैसर्गिक चक्रात अडथळा निर्माण करू शकतात. परिणामी सकाळी उठल्यावर थकवा, अस्वस्थता व चिडचिड वाटू शकते. (प्रतिमा: पेक्सेल्स)
-
१. डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट आरोग्यासाठी चांगले मानले जाते; पण रात्री ते खूप घातक ठरू शकते. त्यात कॅफिन आणि थियोब्रोमाइन हे दोन्ही शरीराला जागे ठेवणारे घटक असतात. विशेषतः कॅफिन तुमच्या शरीरात आठ तासांपर्यंत टिकू शकते. त्यामुळे झोपण्याअगोदर चॉकलेट खाल्लं, तर झोप दूर पळू शकते. (प्रतिमा: पेक्सेल्स) -
चॉकलेटमधील लपलेला खोडकर घटक
डार्क चॉकलेटमधील थियोब्रोमाइन तुमचं हृदय जलद ठोके देण्यासाठी जबाबदार ठरतो. त्यामुळे तुम्हाला शांत होणे कठीण जाते. रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याचा मोह टाळा; अन्यथा मध्यरात्री जागे राहावे लागू शकते. (प्रतिमा: पिक्साबी) -
२. जुने चीज
चेडर, परमेसन किंवा ब्ल्यू चीज खूप चविष्ट वाटतं; पण त्यात असतो टायरामाइन. हा पदार्थ मेंदूतील उत्तेजक रसायने वाढवतो. त्यामुळे अशांत झोप, विचित्र किंवा नकारात्मक स्वप्ने पडण्याची शक्यता वाढते. (प्रतिमा: पिक्साबी) -
तुम्ही रात्री वाइनसोबत चीज खाल्ले आणि तुम्हाला विचित्र स्वप्ने पडली आहेत. असे कधी झाले असेल, तर त्याचे कारण जुने चीज असू शकते. कारण- त्यामध्ये टायरामाइन आणि फॅट्स जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया मंद होऊन शरीर यंत्रणा रात्रीसुद्धा काम करत राहते. परिणामी विश्रांती कमी होऊन, अस्वस्थता जास्त प्रमाणात वाढते. (प्रतिमा: पिक्साबी)
-
३. आइस्क्रीम
दिवसभर थकल्यावर आइस्क्रीम हवंहवंसं वाटतं; पण यात साखर आणि चरबी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तातील साखरेत अचानक वाढ होते. त्यातून ऊर्जा मिळते खरी; पण नंतर थकवा येऊन, तुमची झोप बिघडू शकते. (प्रतिमा: पेक्सेल्स) -
आइस्क्रीममधील साखर, फॅट्स व दूध हे त्रिकूट काही लोकांना पचवायला जड जाते. ते तुमच्या झोपेचे नैसर्गिक चक्र बिघडवू शकते आणि मग झोप न लागल्याने मध्यरात्री उठून बसावे लागण्याचे ते एक कारण ठरू शकते. (प्रतिमा: पेक्सेल्स)
-
४. टोमॅटो
टोमॅटो कितीही ताजे असोत; पण त्यात भरपूर आम्लता असते. त्यामुळे रात्री टोमॅटो खाल्ल्यावर छातीत जळजळ होऊ शकते. विशेषतः तुम्हाला आम्ल रिफ्लक्सचा त्रास होत असेल तर. झोपेच्या आधी टोमॅटो खाणे टाळलेलेच बरे. (प्रतिमा: पेक्सेल्स) -
टोमॅटोमध्ये टायरामाइन नावाचे द्रव्य असते, जे मेंदूला सतर्क ठेवणारे रसायन वाढवते. त्यामुळे उशिरा खाल्लेला टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा तुम्हाला झोपेऐवजी जागे ठेवू शकतो. (प्रतिमा: पिक्साबी)
-
५. मसालेदार अन्न
मसालेदार करी किंवा झणझणीत स्नॅक्स झोपण्याआधी खाल्ल्यास शरीराचे तापमान वाढते. (प्रतिमा: पिक्साबी) -
मसाल्यामुळे होते अपचन
मसालेदार पदार्थ झोपण्याआधी खाल्ल्यास अपचन होऊ शकतो. त्यातून अस्वस्थता निर्माण होते आणि तुम्ही झोपू शकत नाही किंवा मधेच झोपमोड होते. (प्रतिमा: पेक्सेल्स)
‘हे’ ५ अन्नपदार्थ झोपेवर करतात थेट परिणाम; रात्रीच्या जेवणात टाळलेले बरे….
झोप न लागण्यामागे कारण तुमच्या ताटात लपलेलं असू शकतं! डार्क चॉकलेट, जुने चीज, आइस्क्रीम, टोमॅटो आणि मसालेदार पदार्थ हे सर्व झोपेच्या चक्रात अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्ही झोपेआधी काय खाता, याकडे लक्ष द्या आणि सकाळची प्रसन्नता अनुभवा.
Web Title: These five foods directly affect your sleep avoid eating them in dinner svk 05