-
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोकांमध्ये प्रथिनांची कमतरता जाणवते. तज्ज्ञ सांगतात की, आपल्या शरीराच्या वजनाइतकीच ग्रॅम प्रथिनं रोजच्या आहारातून मिळणं आवश्यक असतं. मांसाहारींसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी शाकाहारींसाठी मात्र प्रथिनांचा स्रोत मर्यादित आहे. पण, काळजीचं काही कारण नाही. तुम्हाला चवही हवी आणि आरोग्याचाही विचार करायचा असेल, तर शेंगदाण्याची ही चविष्ट आणि पौष्टिक चटणी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
-
शेंगदाणा : छोटा; पण शक्तिशाली!
शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम, नियासिन, तांबे, ओलिक अॅसिड यांसारखी महत्त्वाचे पोषण घटक असतात. त्यामुळे शरीरात अँटीऑक्सिडंट्स वाढतात आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. हाडे मजबूत ठेवण्यासही शेंगदाणे मदत करतात. म्हणूनच प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी शेंगदाण्याची चटणी हा एक साधा; पण प्रभावी उपाय आहे. -
शेंगदाण्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य :
१०० ग्रॅम शेंगदाणे, ५० ग्रॅम किसलेला नारळ, १ चमचा रिफाइंड तेल, २ चमचे किसलेले आले, २ चमचे कांदा, ५-६ चिरलेल्या सुक्या लाल मिरच्या, २ चमचे चिंचेचा कोळ, १० गोड कडुलिंबाची पाने, १ चमचा नारळ तेल, १ चमचा मीठ -
सोप्या पद्धतीने तयार करा शेंगदाणा चटणी
प्रथम एका कोरड्या पॅनमध्ये शेंगदाणे आणि नारळ हलक्या आचेवर खरपूस भाजून घ्या. त्यानंतर त्यात रिफाइंड तेल, चिरलेले आले, लसूण, लाल मिरच्या व चिंचेचा कोळ घालून परतून घ्या. या सर्व साहित्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा. -
तडका देऊन वाढवा आरोग्यदायी चव
नंतर एका छोट्या कढईत खोबरेल तेल गरम करून, त्यात मोहरी आणि कडुलिंबाची पाने टाका. हा तडका तयार केलेल्या चटणीवर घाला. तुमची आरोग्यदायी आणि प्रथिनयुक्त शेंगदाणा चटणी तयार! ही चटणी जेवण, डोसा किंवा भाकरीसोबत अगदी उत्तम लागते.
(हेही पहापावसाळ्यात दही खाण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या )
प्रथिनांची कमतरता? शेंगदाण्याची ही चविष्ट चटणी ठरेल आरोग्यदायी उपाय
प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी चविष्ट आणि आरोग्यदायी शेंगदाणा चटणी हा एक सोपा व प्रभावी पर्याय आहे. शेंगदाण्याचे पोषणमूल्य आणि ही खास रेसिपी जाणून घ्या.
Web Title: Protein rich peanut chutney recipe for vegetarians healthy tasty easy homemade indian food svk 05