• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health benefits of fenugreek methi and badishep water for weight loss and digestion svk

सकाळी एक ग्लास मेथी-बडीशेप पाणी; ‘हे’ ६ फायदे शरीरात घडवतील सकारात्मक बदल

दैनंदिन आरोग्य सुधारण्यासाठी मेथी-बडीशेप पाणी हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय ठरतो. हे पेय पचन सुधारते, पोटाची चरबी कमी करते, हृदय आणि यकृताचे आरोग्य राखते, तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.

July 18, 2025 18:48 IST
Follow Us
  • Fenugreek and fennel
    1/9

    जर तुम्ही तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी एखादा नैसर्गिक आणि सोपा उपाय शोधत असाल, तर मेथी आणि बडीशेपचे पाणी हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. रोजच्या जीवनात या पेयाचा समावेश केल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 2/9

    पोटाची चरबी कमी करण्यास मदत
    मेथीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते, जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते आणि पोटाच्या भागातील चरबी घटवते. बडीशेप पचन सुधारते, पोट फुगणे कमी करते आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकते. त्यामुळे पोट अधिक बारीक दिसते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 3/9

    पचनक्रिया सुधारते
    मेथी आणि बडीशेप हे दोन्ही घटक पचनासाठी उपयुक्त मानले जातात. गॅस, आम्लता व बद्धकोष्ठता यांसारख्या त्रासांवर ते प्रभावी ठरतात. त्यामुळे आतडे स्वच्छ राहते आणि अन्न पचायला मदत होते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 4/9

    भूक आणि गोडाची खाण्याची लालसा कमी होते
    वारंवार लागणारी भूक किंवा गोड खाण्याची तीव्र इच्छा होत असल्यास हे पेय उपयुक्त ठरते. मेथी कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करते आणि बडीशेप रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 5/9

    शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते
    सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडून, यकृत शुद्ध होते त्यामुळे शरीर अधिक स्वच्छ होऊन उत्साही वाटते. महिलांमध्ये हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठीही हे मदत करू शकते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 6/9

    हृदयासाठी फायदेशीर
    मेथी कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. दुसरीकडे बडीशेपमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याचे संरक्षण होते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 7/9

    बनवायला सोपे अन् आरोग्यास उपयुक्त
    हे पाणी तयार करणे अगदी सोपे आहे. अर्धा चमचा मेथी पावडर, अर्धा चमचा बडीशेप पावडर, थोडी सुंठ (सुक्या आल्याची पावडर), चिमूटभर दालचिनी, खडे मीठ व थोडा लिंबाचा रस हे सर्व घटक कोमट पाण्यात मिसळून जेवणाआधी प्या. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 8/9

    दैनंदिन वापर आरोग्यास फायदेशीर
    या नैसर्गिक पेयाचा नियमित वापर केल्याने शरीरात दीर्घकालीन सुधारणा होऊ शकते. त्याचा समावेश तुमच्या रोजच्या दिनचर्येत सहजपणे करता येतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 9/9

    टीप : तुम्हाला काही विशिष्ट आरोग्य समस्या असतील किंवा तुम्ही गर्भवती असाल, तर हे पेय घेण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. कोणताही नवा उपाय सुरू करताना डॉक्टरांचा सल्ला उपयुक्त ठरतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

    (हेही पाहा:स्क्रबिंग करताना टाळा ‘या’ चुका; सुंदर त्वचेसाठी अनुसरण करा योग्य स्टेप्सचे )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Health benefits of fenugreek methi and badishep water for weight loss and digestion svk05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.