-
दात खराब होण्याची कारणं
तोंड स्वच्छ न ठेवणे, चुकीचा आहार, नियमित दात न घासणे आणि मानसिक तणाव यामुळे दात खराब होतात. यामध्ये ब्रुक्सिझम म्हणजे झोपेत किंवा ताणाखाली असताना दात घासण्याची सवय हे एक महत्त्वाचे कारण ठरते. या सवयीमुळे दात हळूहळू झिजू लागतात आणि कमजोर होतात. -
दात खराब झाले असल्यास काय करावे?
जर दात आधीच खराब झाले असतील तर त्वरित दंततज्ज्ञांचा सल्ला घ्या. ते तुमच्या दातांची तपासणी करून योग्य उपचार, जसे की डेंटल क्राउन, फ्लोराईड वार्निश किंवा इतर उपाय सुचवतील, जे दातांचे संरक्षण करतात आणि त्यांना पुढील नुकसानापासून वाचवतात. -
लवंगाचा वापर करा
लवंग ही एक उत्कृष्ट नैसर्गिक औषधी आहे, जी दातदुखी कमी करण्यासाठी आणि दातांच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. लवंगामध्ये यूजेनॉल नावाचे अँटीसेप्टिक गुणधर्म असते, जे जंतू नष्ट करण्यास मदत करते. -
जीर्ण दातांवर उपचार : जीर्ण झालेले दात स्वतःहून बरे होऊ शकत नाहीत कारण त्यांचे इनॅमल परत वाढत नाही, तरीही जर तुम्ही ही समस्या टाळण्यासाठी काही घरगुती उपाय शोधत असाल तर येथे जाणून घ्या.
-
मॅग्नेशियमयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करा
पालक, केळी, भोपळ्याच्या बिया आणि बदाम यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे खनिज दातांच्या संरचनेसाठी उपयुक्त असून, त्याच्या सेवनाने दात मजबूत राहतात आणि किडण्याचा धोका कमी होतो. -
मीठ आणि मोहरीच्या तेलाचा घरगुती उपाय
मीठ आणि मोहरीचे तेल दातांच्या अनेक समस्या दूर करू शकते. एक चमचा मीठात थोडेसे मोहरीचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवर हलक्या हाताने मालिश करा, यामुळे दात मजबूत होतात आणि किडण्याची समस्या कमी होते. -
तणाव टाळा आणि ध्यान करा
दात खराब होण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे मानसिक तणाव आणि चिंता. रोज सकाळी १० ते १५ मिनिटं ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम केल्यास मन शांत राहतं, त्यामुळे तणाव कमी होतो आणि दातांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.
Photos: दात लवकर का खराब होतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय!
Say Goodbye to Tooth Decay : जर दात खराब झाले असतील आणि त्यामुळं वेदना होत असतील तर काळजी करू नका. काही सोप्या आणि नैसर्गिक घरगुती उपायांनी दात मजबूत करता येतात. दातांच्या समस्यांवर वेळेवर लक्ष दिलं तर पुढील त्रास टाळता येतो.
Web Title: Say goodbye to tooth decay try these home remedies today ama 06