-
दातांमध्ये झिणझिण्या (तीव्र वेदना) येणे ही समस्या सामान्य होत चालली आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे खूप गरम आणि खूप थंड पदार्थांचे सेवन करणे. खरं तर, जेव्हा आपण खूप गरम पदार्थ खातो तेव्हा त्याचा आपल्या दातांवरही परिणाम होतो. (Photo: Freepik)
-
याशिवाय, जास्त थंड पाणी पिल्याने दातांवरही वाईट परिणाम होतो. याशिवाय, जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दातांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते. (Photo: Freepik)
-
दातामधल्या तीव्र वेदनांच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आहेत. चला जाणून घेऊया हे उपाय कोणते आहेत: (Photo: Freepik)
-
लवंग तेल
प्राचीन काळापासून लोक दातांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी लवंगाचा वापर करत आहेत. लवंगाचे तेल नैसर्गिक भूल देण्याचे काम करते, ज्यामुळे वेदना कमी होतात. कापसाच्या मदतीने लवंगाच्या तेलाचे काही थेंब दातांवर लावल्याने काही काळाने वेदना होणे दूर होते. काही दिवस हा उपाय केल्याने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. (Photo: Freepik) -
हळद
: हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे अनेक दंत आजार बरे करण्यास मदत करतात. हळद आणि मोहरीचे तेल मिसळून दिवसातून दोनदा दातांवर लावल्याने ही समस्या दूर होते. (Photo: Freepik) -
तेल
नारळाच्या तेलाने देखील आराम मिळू शकतो. यामुळे केवळ दातांमधल्या वेदनाच नाही तर पिवळेपणा, प्लेक आणि पोकळी देखील दूर होऊ शकतात. (Photo: Pexels) -
मीठ पाणी
पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने देखील या समस्येपासून आराम मिळतो. (Photo: Freepik) -
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे दातांच्या मुंग्या, वेदना दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. यासाठी, ग्रीन टी एका कप पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर त्याच्या गुळण्या करा. (Photo: Unsplash) -
लसूण
लसूण देखील या समस्येवर खूप प्रभावी ठरू शकतो. खरं तर, त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-फंगल गुणधर्म भरपूर असतात जे दातदुखी आणि मुंग्या येणेमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतात. लसणाच्या दोन-तीन पाकळ्या चावल्याने या समस्येत आराम मिळू शकतो. (Photo: Unsplash) हेही पाहा- आपण देवावरच्या श्रद्धेमुळे मंदिरात अनवाणी जातो पण त्यामागील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे माहिती आहेत का?
दातांना येणाऱ्या झिणझिण्यांवर सोपे आणि प्रभावी ६ आयुर्वेदिक उपाय, एकदा नक्की ट्राय करा
Tooth Sensitivity Ayurvedic treatment: आजकाल दातांमध्ये झिणझिण्या येणे ही समस्या खूप सामान्य होत चालली आहे. काही आयुर्वेदिक उपाय आहेत जे या समस्येपासून आराम देऊ शकतात.
Web Title: Ayurvedic treatment for tooth sensitivity in marathi spl