-
केसांपासून बनलेले टूथपेस्ट
किंग्ज कॉलेज, लंडनमधील शास्त्रज्ञांनी केस, त्वचा आणि लोकरमध्ये आढळणारे केराटिन प्रोटीन वापरून दातांच्या समस्यांवर उपयोगी पडेल असे संशोधन केले आहे. ही टूथपेस्ट दातांच्या मुलाम्याचे संरक्षण करून त्यांना किडण्यापासून थांबवू शकते. (स्रोत: फ्रीपिक) -
फ्लोराईडपेक्षा वेगळा पर्याय
केराटिन शॅम्पू व केसांच्या उत्पादनांत आधीच वापरले जाते. संशोधक सांगतात की, हे सूक्ष्म क्रॅक आपोआप बरे करू शकते, जे फ्लोराईडला शक्य होत नाही, त्यामुळे दात स्वतःचे संरक्षण करू शकतील ही आशादायी कल्पना आहे. (स्रोत: फ्रीपिक) -
अजून सुरुवातीच्या टप्प्यातले संशोधन
दंततज्ज्ञ डॉ. तानिया निझवन यांचे म्हणणे आहे की, फ्लोराईड अजूनही सर्वात विश्वासार्ह आहे. केराटिन हा नवोपक्रम आशादायी असला तरी तो प्रयोगशाळेपुरता मर्यादित असून लोकरीपासून मिळालेला आहे. अजूनही क्लिनिकल चाचण्या बाकी आहेत. (स्रोत: फ्रीपिक) -
दातांवर नवा थर निर्माण करण्याची क्षमता
डॉ. नियती अरोरा सांगतात की, केराटिन लाळेतील खनिजांशी संयोग करून इनॅमलसारखा क्रिस्टल थर तयार करू शकतो. जर हे यशस्वी झाले तर दंतचिकित्सेत मोठी क्रांती घडेल. (स्रोत: फ्रीपिक) -
दंत उपचारांची जागा नाही
तज्ज्ञांचे मत आहे की, केराटिन-आधारित टूथपेस्ट हे नियमित दंत उपचारांचा पर्याय नसून अतिरिक्त संरक्षण आहे. किरकोळ नुकसान दुरुस्त करण्यास मदत होईल, पण दाताची काळजी घेणं नेहमीच आवश्यक राहील. (स्रोत: पेक्सेल्स) -
सुरक्षितता आणि ॲलर्जीची शक्यता
केराटिन सुरक्षित मानले जात असले तरी ते केस किंवा लोकरपासून मिळत असल्याने काहींना ॲलर्जी होऊ शकते, त्यामुळे दीर्घकालीन वापरापूर्वी कठोर सुरक्षितता चाचण्या होणे गरजेचे आहे. (स्रोत: पेक्सेल्स) -
पुढील वाटचाल : अजून संशोधन बाकी
सध्या केराटिन दंत उत्पादनात वापरले जात नाही. तज्ज्ञ सांगतात की, क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच सुरक्षितता व ॲलर्जीविषयी स्पष्टता येईल. मात्र, हा शोध दंत आरोग्यासाठी नवी दिशा देणारा ठरू शकतो. (स्रोत: पेक्सेल्स)
केसांपासून बनलेली टूथपेस्ट तुमचे दात खरोखर बरी करू शकते? शास्त्रज्ञांचं थक्क करणारं संशोधन
किंग्ज कॉलेज, लंडनच्या संशोधनानुसार केराटिन-आधारित टूथपेस्ट सूक्ष्म दंतदोष दुरुस्त करू शकते, फ्लोराईडच्या पद्धतीपेक्षा नवीन आणि आशादायी उपाय.
Web Title: Keratin toothpaste teeth repair stop cavities natural protein dental care innovation svk 05