-

संपूर्ण शरीराच्या संरक्षणात व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावत असते. व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्गांपासून बचावासाठी हे व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
त्वचेला तरून ठेवते व्हिटॅमिन सी शरीरातील कोलेजन निर्मितीला चालना देते, ज्यामुळे त्वचा तजेलदार राहते. सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
हृदयाचे आरोग्य सुधारते हे जीवनसत्त्व ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
शरीरातील लोह वाढवते वनस्पतीजन्य अन्नातून मिळणारे लोह शरीरात नीट शोषले जावे यासाठी व्हिटॅमिन सी मदत करते. त्यामुळे अॅनिमियाचा धोका कमी होतो आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
मेंदूची कार्यक्षमता वाढवते व्हिटॅमिन सी मेंदूतील पेशींना नुकसानीपासून संरक्षण देते आणि न्यूरोट्रान्समीटरच्या निर्मितीत मदत करते. परिणामी एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
पेशींचे संरक्षण करते हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असल्याने शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करते. त्यामुळे पेशींचे नुकसान कमी होते आणि दीर्घकाळ चांगले आरोग्य टिकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
दात आणि हिरड्यांचे आरोग्य जपते पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्याने हिरड्यांची सूज कमी होते किंवा हिरड्या सुजत नाहीत. त्यामुळे तोंडाचे आरोग्य मजबूत राहते. (टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
व्हिटॅमिन सीचे ‘हे’ ६ चमत्कारी फायदे; सौंदर्य, ताकद व निरोगीपणाचं रहस्य!
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार जाणून घेऊया तजेलदार त्वचा, मजबूत हृदय, उत्तम स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे जीवनसत्त्व कसे महत्त्वाचे आहे.
Web Title: Vitamin c six amazing health benefits for skin glow heart protection brain function svk 05