Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai underground metro work under mithi river photos asy

मुंबई वाहतूकोंडीच्या मगर’मिठी’तून सुटणार; मिठी खालून मेट्रो धावणार

February 28, 2020 12:03 IST
Follow Us
  • मुंबई : कुलाबा ते सीप्झ या ‘मेट्रो ३’ मार्गासाठी मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण झाले आहे. नदीपात्रापासून १४ मीटर खोल भागात ९० मीटर लांबीच्या अवाढव्य ‘टनेल बोअरिंग मशिन’द्वारे (टिबीएम) हे काम पूर्ण करण्यात आले असून, धारावी स्थानकापर्यंतचे भुयारीकरण जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
    1/10

    मुंबई : कुलाबा ते सीप्झ या ‘मेट्रो ३’ मार्गासाठी मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण झाले आहे. नदीपात्रापासून १४ मीटर खोल भागात ९० मीटर लांबीच्या अवाढव्य ‘टनेल बोअरिंग मशिन’द्वारे (टिबीएम) हे काम पूर्ण करण्यात आले असून, धारावी स्थानकापर्यंतचे भुयारीकरण जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

  • 2/10

    ‘मेट्रो ३’ मार्गासाठी वांद्रे-कुर्ला संकुल ते धारावी स्थानकादरम्यान मिठी नदी ओलांडावी लागते. या नदीचे पात्र २५० मीटर असले तरी भोवतालचा परिसर हा कांदळवन आणि दलदलीचा असल्यामुळे या टप्प्यातील भुयारीकरण आव्हानात्मक होते. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

  • 3/10

    संपूर्ण मार्गिकेसाठी ‘टिबीएम’च्या जोडीने ‘अर्थ प्रेशर बॅलन्सिंग’ तंत्र वापरल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉपॉरेशन (एमएमआरसी)चे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी सांगितले. ‘टीबीएम’च्या साहाय्याने आपल्याला हवा तेवढा भाग खोदताना चहुबाजूंनी येणाऱ्या दाबानुसार खोदकामाचा वेग नियंत्रित केला जातो. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

  • 4/10

    वांद्रे-कुर्ला संकुल ते विद्यानगरी या टप्प्यात मिठी नदी शेजारून वाहत असल्यामुळे तेथेदेखील हेच तंत्र वापरले जात आहे. देशातील अशाप्रकारचा नदीखालील भुयारीकरणाचा हा दुसरा प्रकल्प आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

  • 5/10

    वांद्रे-कुर्ला संकुल हे ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील सर्वात मोठे स्थानक आहे. तसेच मेट्रो सेवेची वारंवारीतादेखील या स्थानकात सर्वाधिक असणार आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

  • 6/10

    या स्थानकात गाडय़ांचा मार्ग बदलण्यासाठी अप आणि डाऊन मार्गाव्यतिरिक्त तिसरी मार्गिकादेखील बांधण्यात येत असून, येथे चार फलाटांची योजना करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

  • 7/10

    वांद्रे-कुर्ला संकुल हे ‘मेट्रो मार्ग २’ डिएन नगर ते मंडाले या स्थानकाशी थेट जोडण्यात येणार असून, प्रवाशांना स्थानकातूनच परस्पर थेट ‘मेट्रो २’च्या मार्गावर जाता येईल. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

  • 8/10

    अप मार्गावरील १.४८ किमीपैकी २०० मीटर भुयारीकरण बाकी आहे, ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे आणि डाऊन मार्गावरील १.४८ किमीपैकी ५०० मीटर भुयारीकरण बाकी आहे, ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.(फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

  • 9/10

    वांद्रे कुर्ला संकुल स्थानकात मेट्रो गाडीचा मार्ग बदलण्यासाठी १.५३ किमीची दोन भुयारे. पैकी एक भुयार मिठी नदीच्या खाली आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

  • 10/10

    मिठी नदीपात्राच्या पृष्ठभागापासून ते मेट्रोच्या भुयाराच्या तळापर्यंतचे अंतर सुमारे २० ते २४ मीटर आहे. आणि मिठी नदीच्या तळापासून ते मेट्रो भुयाराच्या वरच्या टप्प्यापर्यंतचे अंतर ९ मीटर. भुयाराचा व्यास ६.२ मीटर आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)

Web Title: Mumbai underground metro work under mithi river photos asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.