-
अयोध्येत राममंदिर बांधल्याने करोना जाणार आहे का, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे ‘जय श्रीराम’ लिहीलेली १० लाख पत्रे पवार यांच्या निवासस्थानी राज्यभरातून पाठविली जातील, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले. आज पुण्यामधून भाजपा कार्यकर्त्यांनी २५ हजार पत्रे पवारांच्या पत्त्यावर पाठवली. (फाइल फोटो)
-
या पत्रांवर पवार साहेब जय श्री राम असा मजकूर लिहिण्यात आला होता.
-
भाजपा कार्यकर्त्यांनी ही पत्र हातात पकडून आंदोलनही केलं.
-
तर काही पत्रांवर हाताने, 'पवार काका जय श्री राम' असं लिहिलं होतं.
-
पुण्यात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.
-
यावेळी 'पवार साहेब जय श्री राम… जय श्री राम… जय श्री राम…' अशा घोषणा देण्यात आल्या.
-
पुण्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव असल्याने आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मास्क लावल्याचे पहायला मिळालं.
-
तसेच भाजपा समर्थकांनी अयोध्येत राममंदिर बांधले गेले पाहिजे असेही म्हटलं आहे.
-
या आंदोलनामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या.
-
सर्वांनी पत्र पेटीमध्ये ही पत्र टाकली.
-
शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पवार साहेब जय श्रीराम अशा मजकुराची पुण्यातून २५ हजार पत्रे पाठविण्यात आली आहेत.
-
अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमीपूजन ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. पवार यांनी केलेले वक्तव्य खेदजनक असल्याने त्यांना पत्रे पाठवून निषेध करण्यात येत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी गुरुवारी म्हटले होते.
-
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनीही गुरुवारी पत्रं पोस्ट केली आहे. त्यांनी या आंदोलनाचे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअऱ केले आहेत
-
अनेक कार्यकर्त्यांनी रांगे उभं राहून एक एक करुन अशाप्रकारे पत्र पेटीमध्ये टाकली.
-
प्रभू श्री रामाचे मंदिर उभारण्यास समर्थन दर्शवणारी एक हजार पत्रे खासदार शरद पवार यांना पाठवण्याचा कार्यक्रम कोल्हापूरमधील शिरोळ येथे गुरुवारी भाजपाच्या वतीने घेण्यात आला. पोस्ट कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांनी पत्रावर ‘जय श्रीराम’ असा उल्लेख करत ती पवारांच्या मुंबईच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठवली.
-
शरद पवारांनी केलेलं राम मंदिराबाबत केलेलं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातलं नाही तर प्रभू रामचंद्रांविरोधातलं आहे अशी घणाघाती टीका उमा भारती यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना सोमवारी केली आहे. त्यामुळे आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
“पवार साहेब… जय श्री राम…”च्या घोषणा देत पुण्यातून भाजपाने पाठवली २५ हजार पत्रं
‘जय श्रीराम’ लिहीलेली १० लाख पत्रे राज्यभरातून पवारांना पाठवणार
Web Title: Pune bjp unit sent 25000 letters to ncp leader sharad pawar with message saying jai shri ram scsg