Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. kargil vijay diwas 21st anniversary 10 interesting facts about kargil vijay diwas you must know scsg

कारगिल विजय दिवसाबद्दलच्या ‘या’ १० गोष्टी खास तुम्हाला ठाऊक आहेत का?

२६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये फडकावला विजयाचा झेंडा

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो. कारगिल युद्धाला आज २१ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आठवण करुन देणारा हा दिवस. चला तर मग जाणून घेऊयात कारगिल विजय दिवसाबद्दलच्या दहा गोष्टी..
    1/11

    आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो. कारगिल युद्धाला आज २१ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आठवण करुन देणारा हा दिवस. चला तर मग जाणून घेऊयात कारगिल विजय दिवसाबद्दलच्या दहा गोष्टी..

  • 2/11

    १. भारत आणि पाकिस्तानमध्ये जुलै १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती. १. भारत आणि पाकिस्तानमध्ये जुलै १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती. (Source: Express archive photo)

  • 3/11

    २. समुद्र सपाटीपासून १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानं धाडसानं शत्रूवर विजय मिळवला होता. (Source: Express archive photo)

  • 4/11

    ३. ८ मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. २६ जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चाललं. अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढा देत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं. (Source: Express archive photo)

  • 5/11

    ४. या युद्धात भारतीय सैन्याचे ५०० हून अधिक जवान शहिद झाले होते तर जवळपास एक हजारहून अधिक जवान जखमी झाले होते. ‘ऑपरेशन विजय’ची जबाबदारी जवळपास दोन लाख जवानांवर सोपवली होती. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होती. परिणामी फौजेची गणसंख्या २० हजारपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली.

  • 6/11

    ५. कारगिल युद्धापूर्वी १९९८ मध्ये पाकिस्तानने आण्विक चाचणी केली होती. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचं पहिलंच युद्ध होतं. (Express Photo by Tashi Tobgyal)

  • 7/11

    ६. युद्धापूर्वी पाकिस्तानने आपल्या वायूदलाच्या प्रमुखांना ऑपरेशनची माहिती दिली नव्हती. त्यामुळे जेव्हा त्यांना कारगिल युद्धाविषयी सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पाकिस्तान सैन्याला साथ देण्यास नकार दिला. (Express Photo by Tashi Tobgyal)

  • 8/11

    ७. भारतीय वायूदलाने युद्धादरम्यान मिग २७ आणि मिग २९ या दोन लढाऊ विमानांचा वापर केला होता. (source: express archive photo)

  • 9/11

    ८. ८ मे रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर ११ मे पासून भारतीय वायूदलाने सैन्याची मदत करण्यात सुरुवात केली. जवळपास ३०० लढाऊ विमानं युद्धभूमीवर उतरवण्यात आली होती. (Express Photo by Tashi Tobgyal)

  • 10/11

    ९. १९९९च्या फेब्रुवारीपासूनच पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्यांचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. यातच भर म्हणजे, भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नव्हती. त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र चांगलीच टीका झाली होती. (Express Photo by Tashi Tobgyal)

  • 11/11

    १०. या युद्धात १८ ग्रेनेडियर्स, २ राजपुताना रायफल्स, १३ जम्मू-काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स आणि ८ शीख रेजिमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला होता.

Web Title: Kargil vijay diwas 21st anniversary 10 interesting facts about kargil vijay diwas you must know scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.