Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rafale jets taking off from france to join the indian air force scsg

राफेल विमानांची पहिली तुकडी भारताकडे झेपावली; पाहा फ्रान्समधील एअरबेसवरील खास फोटो

या विमानांच्या तोडीचे एकही विमान चीन आणि पाकिस्तानकडे नाही

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. (सर्व फोटो : एएनआय)
    1/11

    भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. (सर्व फोटो : एएनआय)

  • 2/11

    भारतामध्ये ही विमाने हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर उतरतील. तोच या राफेल विमानांचा तळ असेल. २०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे.

  • 3/11

    राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे.

  • 4/11

    राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. या वैमानिकांना विशेष सन्मान चिन्ह ही देण्यात आलं.

  • 5/11

    उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल तसेच अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील.

  • 6/11

    फ्रान्समधील तळावरुन उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूताने भारतीय वैमानिकांबरोबर चर्चा केली.

  • 7/11

    सर्व काही नियोजनानुसार झाले, तर २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.

  • 8/11

    भारतीय हवाईदलाच्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे.

  • 9/11

    पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.

  • 10/11

    राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल.

  • 11/11

    भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाहीय.

Web Title: Rafale jets taking off from france to join the indian air force scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.