• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. swachh survekshan 2020 these are the dirtiest cities of india scsg

Swachh Survekshan 2020: देशातील सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीतील १० पैकी सहा शहरे बिहारमधील

टॉप पाच सर्वाधिक अस्वच्छ शहरांपैकी चार शहरे बिहारमध्ये

August 21, 2020 14:09 IST
Follow Us
  • नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील १३ असे एकूण १७ पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. मोठय़ा राज्यांच्या मानांकनात राज्याला दुसरा क्रमांक मिळाला असून, सर्वाधिक स्वच्छ शहराचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबईला, तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे. मात्र एकीकडे महाराष्ट्राने हा सन्मान मिळवलेला असतानाच दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील सहा शहरांचा समावेश आहे. पहिल्या दोन्ही स्थानांबरोबरच चौथ्या, पाचव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर बिहारमधील शहरांचा समावेश आहे. पाहुयात  अस्वच्छ शहरांची यादी स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतील तळाच्या दहा शहांची यादी...
    1/

    नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील १३ असे एकूण १७ पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. मोठय़ा राज्यांच्या मानांकनात राज्याला दुसरा क्रमांक मिळाला असून, सर्वाधिक स्वच्छ शहराचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबईला, तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे. मात्र एकीकडे महाराष्ट्राने हा सन्मान मिळवलेला असतानाच दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील सहा शहरांचा समावेश आहे. पहिल्या दोन्ही स्थानांबरोबरच चौथ्या, पाचव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर बिहारमधील शहरांचा समावेश आहे. पाहुयात  अस्वच्छ शहरांची यादी स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतील तळाच्या दहा शहांची यादी…

  • 2/

    १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे बिहारमधील साहारसा हे शहर. (फोटो: गुगल मॅप्सवरुन साभार)

  • 3/

    बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे. (फोटो: गुगल मॅप्सवरुन साभार)

  • 4/

    आठव्या स्थानी आहे नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर. (फोटो: विकिमिडिया कॉमन्सवरुन साभार)

  • 5/

    अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे. (फोटो: विकिमिडिया कॉमन्सवरुन साभार)

  • 6/

    मेघालयमधील शिलाँग शहर अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे. (फोटो: विकिमिडिया कॉमन्सवरुन साभार)

  • 7/

    अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल पाचपैकी चार शहरे ही बिहारमधील आहेत. पाचव्या स्थानी आहे परसा बाजार. हे शहर बिहारमध्ये आहे. (फोटो: गुगल मॅप्सवरुन साभार)

  • 8/

    चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे. (फोटो: विकिमिडिया कॉमन्सवरुन साभार)

  • 9/

    तिसऱ्या स्थानी पंजाबमधील अबोहार शहर आहे. अव्वल पाचमध्ये हे एकमेव शहर आहे जे बिहार बाहेरील आहे. (फोटो: गुगल मॅप्सवरुन साभार)

  • 10/

    दुसऱ्या स्थानी बक्सर शहर आहे.  (फोटो: विकिमिडिया कॉमन्सवरुन साभार)

  • 11/

    तर सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील गया शहर अव्वल स्थानी आहे. (फोटो: विकिमिडिया कॉमन्सवरुन साभार)

  • 12/

    याशिवाय १० लाख लोकसंख्या असणाऱ्या सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाटण्याचा पहिला क्रमांक आहे. अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल दहामध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाहीय. (फोटो: पिक्सरवरुन साभार)

Web Title: Swachh survekshan 2020 these are the dirtiest cities of india scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.