Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. us election 2020 kamala harris ancestral village in tamil nadu prays for her victory scsg

कमला हॅरिस आगे बढो… तामिळनाडूमधील ‘या’ गावात लागले पोस्टर्स

उपराष्ट्राक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस निवडणुकीच्या रिंगणात

Updated: September 9, 2021 18:38 IST
Follow Us
  • अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपराष्ट्राक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड केली असून आज कमला देवी यांचे भवितव्यही मतपेटीत बंद होणार आहे. (सर्व फोटो एएनआय आणि रॉयटर्सवरुन साभार)
    1/20

    अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपराष्ट्राक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड केली असून आज कमला देवी यांचे भवितव्यही मतपेटीत बंद होणार आहे. (सर्व फोटो एएनआय आणि रॉयटर्सवरुन साभार)

  • 2/20

    अमेरिकेतील या निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमधील कमला यांच्या आईच्या गावी त्यांच्या विजयासाठी विशेष पुजेचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • 3/20

    मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून मोफत इडली सांबर दिला जात आहे. "कमला यांचा विजय व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत," असं एका स्थानिकाने एएनआयशी बोलताना सांगितलं.

  • 4/20

    गावामध्ये कमला यांच्या विजयासाठी पोस्टर्सही लावण्यात आले आहेत.

  • 5/20

    "थुलासेनथीरापुरम ते अमेरिका. मूळच्या थुलासेनथीरापुरममधील असणाऱ्या अमेरिकच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना भरपूर यश मिळो यासाठी शुभेच्छा," असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. 

  • 6/20

    बायडेन आणि कमला हॅरिस यांचा विजय झाल्यास कमला या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरतील. कॅलिफोर्नियामधून खासदार असलेल्या कमला हॅरीस यांनी कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणूनही काम केलं आहे.

  • 7/20

    कमला या पोलीस सुधारणेच्या त्या कट्टर समर्थक आहेत. ५५ वर्षांच्या कमला हॅरीस यांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांचे आई-वडील हे अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले होते.

  • 8/20

    कमला यांच्या आईचा म्हणजे श्यामला गोपालन हॅरीस यांचा जन्म चेन्नईतला. त्या कॅन्सर रिसर्चर होत्या. २००९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर कमला हॅरीस यांच्या वडिलांचा(डोनाल्ड हॅरिस) जन्म जमैकामधला. ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक आहेत.

  • 9/20

    कमला हॅरीस आणि त्यांची धाकटी बहिण माया हॅरीस दोघी लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. कमला हॅरीस यांनी हाॅवर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं. हाॅवर्डनंतर कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.

  • 10/20

    त्यानंतर कमला वकिली व्यवसायात उतरल्या. यानंतर त्या अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या अ‍ॅटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या. कमला हॅरीस दोन वेळा अ‍ॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर २०१७ साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या.

  • 11/20

    कमला यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता त्यांचे चेन्नईमधील बसंत नगरमधील वरासिद्धी विद्यानगर मंदिराशी असणारं खास नातंही समोर आलं आहे. कमला यांच्या मावशीने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा त्यांनी कमला यांची उमेदवारी दाखल केलेल्या महत्वाच्या निवडणुकांआधी या मंदिरामध्ये १०८ नारळ फोडले तेव्हा कमला यांचा विजय झाला आहे.

  • 12/20

    कमला यांच्या आई श्यामला गोपालन या मंदिराची उभारणी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मंदिर समितीमध्ये होत्या. त्याचबरोबरच नऊ वर्षांपूर्वी जेव्हा कमला देवी यांनी कॅलिफोर्नियाच्या अटॉनी जनरल पदासाठी निवडणूक लढली होती तेव्हा त्यांनी या मंदिरामध्ये विजयासाठी प्रार्थना करायला सांगिलती होती. कमला यांनी आपल्या मावशीला फोन करुन “मावशी, माझ्यासाठी प्रार्थना कर आणि देवळामध्ये नारळही फोड,” असं सांगितलं होतं.

  • 13/20

    कमला यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मावशीने मंदिरामध्ये १०८ नारळ फोडले होते. पारंपरेनुसार अशापद्धतीने नारळ फोडल्याने कोणत्याही कार्यामधील विघ्न दूर होते. कमला यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी आपल्या मावशीला फोन करुन, “तू फोडलेल्या नारळांचा फायदा झाला मावशी. तू फोडलेल्या प्रत्येक नारळामागे मला एक हजार मतं मिळाली आहेत,” असं सांगितलं होतं. 

  • 14/20

    त्यानंतर सहा वर्षींनी कमला यांनी २०१६ साली सिनेटर पदाची निवडणूक लढवली तेव्हा गोपालन यांनी पुन्हा १०८ नारळ फोडले होते. त्या निवडणुकीमध्येही कमला यांचा विजय झाला होता. मात्र आता ज्या निवडणुकीसाठी कमला उभ्या आहेत त्यासाठी गोपालन या अगदी एक हजार ८ नारळ फोड्यासही तयार आहेत. “आम्ही आता बसंत नगरमध्ये राहत नाही. मात्र आम्ही जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा मी नक्की नारळ फोडणार आहे,” असं कमला यांच्या मावशीने ‘बिझनेस लाइन’शी बोलताना सांगितलं होतं. 

  • 15/20

    कमला यांची आई श्यामल यांची छोटी बहीण म्हणजेच कमलाची मावशी सरला या पेशाने डॉक्टर आहेत. श्यामलने पाठिंबा दिल्यानेच आज कमला एवढ्या दूरपर्यंत जाऊ शकली अशी भावना सरला यांनी व्यक्त केली आहे. “माझी बहीण खूप लहान वयामध्येच अमेरिकेला गेली. ती खूप आधुनिक विचारांची होती. तिने नेहमीच आपल्या मुलांना काय बरोबर काय चूक याचं ज्ञान दिलं,” असं सरला सांगतात. 

  • 16/20

    कमला यांना जे आवडतं ते त्यांना त्यांच्या आईने करु दिलं. तर कमला यांनाही आईने दिलेल्या संधीचं सोनं केलं. कमला यांचे आजोबा म्हणजेच पीव्ही गोपालन यांनी तिला अगदी लहान वयामध्येच सामाजिक भान कसं जपावं याची जाणीव करुन दिली.

  • 17/20

    २००९ साली श्यामल यांचा मृत्यू झाला जेव्हा कमला या अस्थिविसर्जनासाठी चेन्नईला आल्या होत्या. आपल्या अस्थींचे विसर्जन बंगालच्या उपसागरामध्ये करावं अशी श्यामल यांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठीच कमला भारतामध्ये आल्या होत्या. काही वर्षांपूर्वी निवडणुकीमधील विजयानंतर सरला यांचे कमला यांच्याशी बोलणं झालं होतं, तेव्हा त्यांनी आत्मविश्वासाने, “मावशी मी इथेच थांबवणार नाहीय मी आणखीन पुढे जाणार आहे,” असं सांगितलं होतं.

  • 18/20

    यापूर्वी अमेरिकेत दोन वेळा महिलेला उपराष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. २००८ साली रिपब्लिकन पक्षाने सारा पॅलिन यांना उमेदवारी दिली होती. तर १९८४ साली डेमोक्रेटिक पक्षाने गिरालाडिन फेरारो यांना उमेदवारी दिली होती.

  • 19/20

    मात्र, सारा पॅलिन आणि गिरालाडिन फेरारो या दोन्ही महिलांचा उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. याआधी अमेरिकेला कधीही कृष्णवर्णीय उपाध्यक्ष लाभलेला नाही. त्यामुळे कमला हॅरीस निवडून आल्यास अमेरिकी निवडणुकीत इतिहास रचला जाईल.

  • 20/20

    भारतीय वंशाच्या कमला यांचा हा प्रवास त्यांना व्हाइट हाऊसमध्ये घेऊन जातो का हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

Web Title: Us election 2020 kamala harris ancestral village in tamil nadu prays for her victory scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.