-
फ्रान्स भारताला पुरवठा करणाऱ्या राफेल फायटर विमानांमध्ये एक नवीन अस्त्र जोडणार आहे. मिका, मिटिओर, स्काल्प या क्षेपणास्त्रांइतकेच हे नवीन स्मार्ट वेपन घातक आहे.
-
मिका, मिटिओरी ही क्षेपणास्त्रे हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकतात तर स्काल्प हे दूर अंतरावरुन जमिनीवरील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार करु शकते.
-
चीनने कुठलीही आगळीक केल्यास, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे लष्कर, नौदल आणि एअर फोर्स पूर्णपणे अलर्ट आहे.
-
-
या किटमध्ये Mk80 सीरीजचे बॉम्ब वापरावे लागतील. हॅमर जीपीएस शिवाय ७० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूकतेने वेध घेऊ शकते.
-
दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये राफेलसोबत हॅमर वेपन देण्याचा करार झाला. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
-
फ्रान्सची डिफेन्स कंपनी साफरानकडून हॅमरची किटची निर्मिती केली जाते. हॅमर विकत घेतल्यानंतर आपल्याला Mk80 सीरीजचे बॉम्ब आयात करावे लागतील.
-
शत्रूच्या टप्प्यात न येता शत्रूच्या प्रदेशातील खोलवर भागातील लक्ष्याचा अत्यंत अचूकतेने वेध घेता येतो. डोंगराळ भागासह कुठल्याही भागातील शत्रूने बनवलेले मजूबत बंकर हॅमर बॉम्बने उद्धवस्त करता येतील. सध्या पूर्व लडाखमध्ये जो, तणाव निर्माण झालाय तो उंच पर्वतीय भाग आहे.
-
भारताने मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकच्यावेळी स्पाइस २००० बॉम्बचा वापर केला होता. हॅमर सुद्धा स्पाइस सारखाच स्मार्ट बॉम्ब आहे. भारताने दोन ते तीन वर्षांपूर्वीच हॅमर स्मार्ट बॉम्बची खरेदी करण्यासाठी बोलणी सुरु केली होती.
-
राफेल ही भारताच्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक विमाने आहेत. २९ जुलैला पाच राफेल विमानांची पहिली तुकडी दाखल झाली. काल आणखी तीन राफेल विमाने दाखल झाली. हॅमरमुळे एअर फोर्सची शक्ती कैकपटीने वाढेल. चीन-पाकिस्तानमध्यो खोलवर अचूकतेने प्रहार करता येऊ शकतो.
फ्रान्सकडून ग्रीन सिग्नल! ‘राफेल’मध्ये जोडणार नवीन घातक अस्त्र
Web Title: Indian rafale fighter jet adds hammer stand off weapon to its lethal arsenal dmp