• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. new covid strain may be in india already experts dmp

आधीपासूनच करोनाचा नवीन स्ट्रेन भारतात असू शकतो, कसं ते समजून घ्या…

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
  • ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा एक नवा स्ट्रेन सापडला आहे. या स्ट्रेनमुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये या स्ट्रेनमुळे अनेकांना मोठया प्रमाणात करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तिथल्या प्रशासनाने ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. (फोटो सौजन्य - AP Photo/Matt Dunham)
    1/11

    ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा एक नवा स्ट्रेन सापडला आहे. या स्ट्रेनमुळे संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये या स्ट्रेनमुळे अनेकांना मोठया प्रमाणात करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तिथल्या प्रशासनाने ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. (फोटो सौजन्य – AP Photo/Matt Dunham)

  • 2/11

  • 3/11

    "यूकेहून आलेल्या प्रवाशांपैकी २० जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यूकेमध्ये या स्ट्रेनमुळे ६० टक्के लोकांना करोनाची बाधा झालीय".

  • 4/11

    "त्या कॅलक्युलेशनने २० पैकी निम्म्यालोकांच्या शरीरात हा स्ट्रेन आढळू शकतो, काही जणांच्या शरीरात हा नवीन स्ट्रेन असण्याची दाट शक्यता आहे" असे डॉ. राकेश मिश्रा म्हणाले. CCMB चे ते संचालक आहेत. इंडिया टुडे बरोबर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

  • 5/11

    "महिन्याभरापूर्वी यूकेहून आलेल्या नागरिकांनी करोना चाचणी करण्यात अर्थ नाही. कारण त्यांच्या शरीरात करोना असूनही कुठलीही लक्षणे दिसली नसतील तसेच त्यांच्याकडून त्याचा फैलाव झालेला असू शकतो" असे तज्ज्ञांनी सांगितले.

  • 6/11

    यूकेत सप्टेंबर महिन्यात सापडलेला करोनाचा हा नवीन स्ट्रेन भारतात आधीच दाखल झालेला असू शकतो असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

  • 7/11

    करोना व्हायरसचा जो मूळ प्रकार आहे, त्यापेक्षा या नव्या स्ट्रेनमुळे ७० टक्के अधिक संक्रमण होऊ शकते, असे म्हटले जाते.

  • 8/11

  • 9/11

    करोनाचा हा जो नवीन स्ट्रेन आहे, त्याला यूकेच्या शास्त्रज्ञांनी “VUI – 202012/01” असे नाव दिले आहे.

  • 10/11

    मानवी शरीराला व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल होत असतात. हे अनपेक्षित नाहीय आणि त्यामुळे चिंता करण्याचीही आवश्यकता नाही असे शास्त्रज्ञ सांगतात.

  • 11/11

    “अनेक करोना प्रतिबंधक लशींची निर्मिती अँटीबॉडीज निर्मितीच्या उद्देशाने करण्यात आली आहे. जेणेकरुन, या अँटीबॉडीज करोना व्हायरसमधील स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करतील.” “लस स्पाइकमधील वेगवेगळया भागांना लक्ष्य करते. त्यामुळे व्हायरसमध्ये एखादे परिवर्तन झाले म्हणून लस उपयोगी ठरणार नाही, असे म्हणता येणार नाही” असे डॉ. गगनदीप कांग म्हणाले.

Web Title: New covid strain may be in india already experts dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.