-
राणे आणि ठाकरे कुटुंबातील संबंध किती तणावपूर्ण आहेत याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे. (सर्व फोटो – संग्रहित)
-
संग्रहीत
-
यामुळे ठाकरे आणि राणे कुटुंबीय कधीच कोणत्याही ठिकाणी एकत्र दिसत नाहीत.
-
पण नुकतंच भाजपा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता.
-
भाजपा आमदार आणि नारायण राणेंचे सुपूत्र नितेश राणे यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
-
झालं असं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्धाटन करण्यात आलं. वैद्यकीय महाविद्यालयासाठी उद्धव ठाकरेंच्या एका स्वाक्षरीची गरज होती.
-
यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं.
-
आमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईलवर उद्धव ठाकरेंनी सही केली. आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही. त्यांना काही दिलं तरी ते घेणार नाहीत. म्हणून सात नगरसेवक आम्ही आभार मानण्यासाठी पाठवत आहोत असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच सिंधुदूर्ग दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर वैभववाडी येथील भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
-
शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात असंही नितेश राणे व्हिडीओत म्हणाले आहेत.
…जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करतात
राणे आणि ठाकरे कुटुंबातील संबंध किती तणावपूर्ण आहेत याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे.
Web Title: Bjp nitesh rane narayan rane shivsena cm uddhav thackeray sgy