-
महाराष्ट्राच्या ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धावत्या ट्रेनमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
-
बलात्काराच्या तक्रारीनंतर ठाणे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार गेल्या बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडलाय.
-
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बलात्काराचा आरोप असलेला तरुण आणि तक्रार करणारी तरुणी दोघंही एकमेकांना आधीपासून ओळखतात.
-
दोघं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. शिवाय दोघांनी लग्नाचाही विचार केला होता.
-
गेल्या बुधवारी सकाळी सातच्या सुमारास गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला.
-
प्रवासादरम्यान तरुणाने ट्रेनच्या शौचालयात मुलीवर बलात्कार केला.
-
सकाळी सातच्या सुमारास ठाणे स्थानकावर ट्रेन आल्यानंतर तरुण शौचालयातून बाहेर आला. थोड्यावेळात तिकीट तपासनीसने त्यांच्याकडे तिकीटाची विचारणा केल्यानंतर तरुणी ट्रेनमधून खाली उतरली. पण, तरुणाने तू पुढे जा मी मागून येतो असे तिला सांगितले.
-
मात्र, नंतर त्याने ट्रेनमध्ये बसून पळ काढला अशी माहिती पोलिसांनी दिली.
-
दरम्यान, या घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी १९ वर्षीय आरोपी युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला, पण हे प्रकरण रेल्वेशी संबंधित असल्याने कुररा पोलिसांनी पुढील कारवाईसाठी या प्रकरणाची फाइल ठाणे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात सोपवली आहे.
तर, पीडित तरुणीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून फरार आरोपीचा शोध घेत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे. (सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे)
खळबळजनक! धावत्या ट्रेनच्या शौचालयात तरुणीवर बलात्कार, ठाण्यातील धक्कादायक घटना
गोरखपूर एक्स्प्रेसमधला धक्कादायक प्रकार…
Web Title: Maharashtra thane 19 year old booked for raping girl in moving trains toilet sas