-
रायगडमध्ये मुंबई- पुणे एक्सप्रेस मार्गावर मोठी दुर्घटना टळली आहे.
-
सोमवारी सकाळी खासगी आराम बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. बोरघाटात एका ढेकू गावाजवळ एका तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे बस कठडे तोडून दरीच्या दिशेने सरकली.
-
अपघातानंतर बस सुमारे ६० फूट खोल दरीत कोसळणार होती.
-
मात्र एका उंबराच्या छोट्या झाडावर बस अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.
-
घटनेची माहिती मिळताच बोरघाट टॅपचे पोलीस निरीक्षक परदेशी, उपनिरीक्षक महेश चव्हाण वाहतुक पोलीसांसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
-
या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. आयआरबी यंत्रणांनी बस बाजूला करून वाहतुक सुरळीत करून दिली.
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर बस ६० फूट दरीत कोसळणार इतक्यात समोर एक छोटं झाड आलं अन्….
रायगडमध्ये मुंबई- पुणे एक्सप्रेस मार्गावर मोठी दुर्घटना टळली आहे
Web Title: Bus accident on mumbai pune expressway sgy