• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ips hemant nagrale journey from job to new mumbai police commissioner scsg

हर्षद मेहता घोटाळ्याचा तपास ते २६/११ ला RDX ‘ताज’बाहेर आणणारा अधिकारी… नगराळेंबद्दलच्या खास २५ गोष्टी

औष्णिक विद्युत केंद्रात नोकरी ते मुंबई पोलीस आयुक्त

Updated: September 9, 2021 00:32 IST
Follow Us
  • सचिन वाझे प्रकरणात आरोपांचा रोख वळलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर या पदावरून बदली करण्यात आली असून त्या जागेवर राज्यातील एक वरीष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती मुंबई पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. (सर्व फोटो : प्रदीप दास, एक्सप्रेस फोटो)
    1/25

    सचिन वाझे प्रकरणात आरोपांचा रोख वळलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर या पदावरून बदली करण्यात आली असून त्या जागेवर राज्यातील एक वरीष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती मुंबई पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. (सर्व फोटो : प्रदीप दास, एक्सप्रेस फोटो)

  • 2/25

    अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून यामध्ये सीआययूचे अधिकारी सचिन वाझे सहभागी असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांना निलंबित केल्यानंतर त्यांचे वरीष्ठ असलेले परमबीर सिंग यांना देखील पदावरून हटवण्याची मागणी केली जात होती. या संपूर्ण प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने टीका केली गेल्यानंतर राज्य सरकारकडून परमबीर सिंग यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. परमबीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आलीय.

  • 3/25

    हेमंत नगराळे हे पोलीस खात्यामधील एक लो प्रोफाइल नाव असल्याने त्यांनी हाताळलेली प्रकरण आणि त्यांची आतापर्यंतची कारकीर्द अनेकांना ठाऊक नाहीय. यावरच आपण या गॅलरीमधून नजर टाकणार आहोत.

  • 4/25

    हेमंत नगराळे हे डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. हेमंत नगराळे हे १९७९-८० मध्ये नागपूरमधील ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयात ज्यूडोचे प्रशिक्षण घ्यायचे. ज्यूडोत त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. राष्ट्रीय पोलीस स्पर्धामध्येही पदक मिळवलं आहे.

  • 5/25

    हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रवतीचे आहेत.

  • 6/25

    हेमंत नगराळे यांचे वडील कार्यकारी अभियंता होते. ते मूळचे चंद्रपूर जिल्हयातील भद्रावती येथील आहेत. त्यांचा जन्मही तेथेच झाला व प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. कालांतराचे त्यांच्या वडिलांची बदली नागपुरात झाली. त्यानंतर त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण सीताबर्डीतील पटवर्धन या सरकारी शाळेतून घेतले.

  • 7/25

    बारावीनंतर त्यांनी व्हीएनआयटी महाविद्यालयातून (पूर्वीचे व्हीआरसी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात नोकरी पत्करली. दरम्यान, त्यांची ओळख तत्कालीन पोलीस अधिकारी पुरुषोत्तम चौधरी यांच्याशी झाली. त्यांनी नगराळे यांना पोलीस दलात अधिकारी पदासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला दिला. हेमंत यांनी युपीएससीची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. १९८७ साली त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली.

  • 8/25

    हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत.

  • 9/25

    १९९८ ते २००२ या चार वर्षांच्या काळात नगराळे यांनी आधी सीबीआयचे एसपी आणि नंतर डीआयजी म्हणून काम पाहिलं आहे.

  • 10/25

    याच काळात हेमंत नगराळेंनी १३० कोटींचा आर्थिक घोटाळा झालेले प्रसिद्ध केतन पारेख प्रकरण, शेअर बाजारातील विख्यात घोटाळा ठरलेल्या ४०० कोटींच्या हर्षद मेहता घोटाळ्याचा तपास केलाय.

  • 11/25

    हेमंत नगराळे यांनी तपास केलेल्या घोटाळ्यांपैकी एक म्हणजे १८०० कोटींच्या माधोपुरा कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा. याचा तपासही नगराळे यांनीच केलाय.

  • 12/25

    २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी हेमंत नगराळे हे एमएसईडीसीएलचे स्पेशल इन्स्पेक्टर जनरल होते. फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार हल्ल्यावेळी नगराळे हॉटेल ताजमध्ये शिरले आणि त्यांनी जखमी आणि मृतांना बाहेर काढण्याची जबाबदारी पार पाडली.

  • 13/25

    तसेच, यानंतर नगराळे यांनी ताजमध्ये ठेवण्यात आलेली आरडीएक्सने भरलेली बॅक स्वत: बाहेर काढून सुरक्षित स्थळी ठेवली आणि नंतर बॉम्ब स्क्वॉडने ही स्फोटकं निष्क्रीय केली.

  • 14/25

    प्रथमच महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

  • 15/25

    नागराळे यांनी चंद्रपूर, रायगड येथे पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक, मुंबईत सहपोलीस आयुक्त, नवी मुंबई आयुक्त आणि केंद्रात प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक आदी पदावर कार्य केले.

  • 16/25

    २०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त देखील राहिले आहेत.

  • 17/25

    हेमंत नगराळे यांच्याविरोधात त्यांच्याच पत्नीने तक्रार केल्याचा देखील प्रकार घडला होता.

  • 18/25

    २००९ मध्ये हेमंत नगराळेंच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणी देखील झाली होती.

  • 19/25

    यामध्ये हेमंत नगराळे यांच्या पत्नी प्रतिमा नगराळे यांनी पतीने आपल्या नावावर बँक अकाऊंट सुरू करून त्याचा वापर बेनामी व्यवहार करण्यासाठी केल्याचा आरोप केला होता.

  • 20/25

    पुढे डिसेंबर २०१० मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने हेमंत नगराळेंवरील हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं.

  • 21/25

    नुकतीच म्हणजेच, ७ जानेवारी २०२१ रोजी हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली होती.

  • 22/25

    हेमंत नगराळे यांनी याआधी २०१४ मध्ये काही काळासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे.

  • 23/25

    राज्याच्या इतिहासात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून पोलीस महासंचालकपदावर अनेक अधिकाऱ्यांना बढती मिळाली किंवा समकक्ष महासंचालकपदी नियुक्ती झाली. मात्र नागराळेंबाबत उटलं घडलं आहे.

  • 24/25

    पोलीस महासंचालक ते मुंबई पोलीस आयुक्त असा नगराळे यांचा उलटा प्रवास झाला आहे. अर्थात मुंबईचे आयुक्तपद हे महासंचालक दर्जाचे असले तरी पोलीस महासंचालक हा राज्य पोलीस दलाचा प्रमुख असतो.

  • 25/25

    हेमंत नगराळे मूळचे नागपूरकर असल्याने मुंबईच्या पोलीस आयुक्तपदीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याने उपराजधानीकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.

Web Title: Ips hemant nagrale journey from job to new mumbai police commissioner scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.