• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra monsoon heavy rainfall waterlogging train bus roadways mumbai rains weather see photos sdn

Mumbai Rains : करोनाशी लढणाऱ्या मुंबईला पावसाने झोडपलं

June 10, 2021 10:38 IST
Follow Us
  • Monsoon Mumbai Rains June 2021
    1/20

    राज्यात आनंद घेऊन येणाऱ्या पावसाची सुरुवात मुंबईसाठी मात्र जनजीवन विस्कळित करणारी ठरली. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/20

    मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई आणि उपनगरांत कहर केला. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 3/20

    तुंबलेले रस्ते, बंद पडलेली लोकल आणि चिखलातून वाट तुडवत घर किंवा कार्यालय गाठताना मुंबईकरांना कसरत करावी लागली. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 4/20

    भरतीच्या वेळेतच जोरदार बरसणाऱ्या जलधारांनी मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडून टाकली. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 5/20

    सतत कोसळणारा पाऊस आणि भरतीच्या जोरामुळे पंपाद्वारे पाणी उपसण्याचे फोल ठरलेले प्रयत्न यामुळे शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत पाणी साचले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 6/20

    मुंबई उपनगरात बुधवारी सरासरी २२०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर, शहर भागात ४५.६ मिलीमीटर पाऊस झाला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 7/20

    पुढील तीन दिवस मुंबई आणि परिसरात देण्यात आलेला अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 8/20

    मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 9/20

    साचलेले पाणी, खड्डे यांमुळे रस्त्यावरील वाहने तासनतास एकाच जागी उभी होती. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 10/20

    दिवसभर मुसळधार पाऊस पडत असतानाही पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत सुरू राहिली. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 11/20

    मात्र तीन ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्ग व हार्बरवरील लोकल सेवा सुमारे दहा तास ठप्प राहिली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 12/20

    कामानिमित्त सकाळी लोकल पकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे यामुळे हाल झाले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 13/20

    काही लोकल दोन स्थानकांदरम्यान उभ्या राहिल्याने लोकलमधून उतरून भर पाण्यातून रुळांवरून वाट काढत प्रवाशांनी जवळचे स्थानक गाठले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 14/20

    पावसात रिक्षा, टॅक्सी, बेस्ट बस मिळवतानाही अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 15/20

    पहिल्याच दिवशी पावसाने मुंबई आणि परिसराला झोडपून काढले आणि पावसाळ्याला तोंड देण्यास सज्ज असल्याचे पालिकेचे दावे निकाली निघाले. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 16/20

    मुंबईत जून महिन्यातील पावसाच्या एकू ण सरासरीच्या ४० टक्के पाऊस बुधवारी एकाच दिवसात उपनगरांमध्ये कोसळला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 17/20

    मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 18/20

    मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड येथेही जोरदार पावसाने हजेरी लावली. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 19/20

    मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा जोर पुढील दोन-तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 20/20

    मुंबई, ठाणे, रायगड येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने १३ जूनपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ म्हणजे सावधानतेचा इशारा कायम आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

Web Title: Maharashtra monsoon heavy rainfall waterlogging train bus roadways mumbai rains weather see photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.